मुंबई : आता रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. स्टेशन आणि ट्रेन स्वच्छ ठेवण्यासाठी रेल्वेने जबरदस्त योजना तयार केली आहे. कोरोनाच्या काळात कडक कारवाई करूनही रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीवर नियंत्रण आलेले नाही. मात्र आता या सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने एक अनोखा मार्ग शोधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानक आणि प्लॅटफॉर्मवरील लोकांच्या या सवयीला आळा घालण्यासाठी रेल्वेने एक योजना आखली आहे. भारतीय रेल्वे दरवर्षी पान आणि तंबाखू खाणाऱ्यांच्या थुंकण्यामुळे होणारे डाग साफ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करते. म्हणजेच एका वाईट सवयीमुळे सरकराचे 1200 कोटी रुपये विनाकारण खर्च होतात.


42 स्थानकांवर वेंडिंग मशीन बसवण्यात येणार
दरवर्षी वाया जाणारे 1200 कोटी वाचवण्यासाठी रेल्वेने आता एक योजना तयार केली आहे. याअंतर्गत प्रवाशांनी रेल्वेच्या आवारात थुंकू नये यासाठी देशभरातील 42 स्थानकांवर वेंडिंग मशीन आणि किऑस्क बसवण्यात येणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेकडून या वेंडिंगग मशीनमध्ये 5 आणि 10 रुपयांपर्यंतचे स्पिटून पाऊच दिले जातील.


थुंकीसाठी मिळणार पाऊच
रेल्वेच्या पश्चिम, उत्तर आणि मध्य रेल्वेच्या तीन झोनने यासाठी नागपूरस्थित स्टार्टअप इझीपिस्टला कंत्राट दिले आहे. या स्पिगॉटची विशेषता अशी आहे की, कोणतीही व्यक्ती सहजपणे आपल्या खिशात ठेवू शकते. या पाऊचच्या मदतीने प्रवासी कधीही डाग न लावता कुठेही थुंकू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकीमुळे होणाऱ्या घाणीतून दिलासा मिळू शकतो. 


पाऊच कसे काम करते?
हे बायोडिग्रेडेबल पाउच 15-20 वेळा वापरले जाऊ शकते. ते थुंकीचे घन पदार्थात रूपांतर करते. एकदा पूर्णपणे वापरल्यानंतर, पाऊच जमिनीत टाकता येते त्याचे विघटन होते.