नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६,०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचारसुरु असलेल्या ११४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ९,७०,११६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४७,५६, १६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ९२,२९० लोकांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात अशी देण्यात येणार कोरोनाची लस?


सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाच्या १९,१६४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,८२,९६३ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,७३,२१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७४,९९३ रुग्ण उपचार घेत आहेत.



दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ९० हजाराखाली आली आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने जास्त असणे, ही एक दिलासादायक बाब आहे. पण, रुग्णवाढीचा वेग मात्र कायम आहे. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.