अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, रेल्वेमंत्री पियुष गोलय यांच्यासोबतच इतरही नेते उपस्थित होते.


अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी अशा या प्रकल्पासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. तर, हा संपूर्ण प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.



या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे केवळ तासाभरात टसूरतला पोहोचता येणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाषण करताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 'नमस्कार' म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली.



आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन यावेळी शिंजो आबे यांनी केलं.