Indore News: इंदूरमध्ये एका लहान मुलाची दिवाळी फटाक्यांमुळे शेवटची ठरली आहे. सुतळी बॉम्बस्फोटामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोखंडी तोफेत बॉम्ब पेटवण्याच्या नादात हा मोठा प्रसंग घडला. सुतळी बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुलगा दूरवर जाऊन पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुतळी बॉम्बच्या स्फोटात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा मुलगा 15 वर्षांचा असून चार बहिणींमध्ये तो एकुलता एक भाऊ होता. ज्या तोफेने तो बॉम्ब डागत होता त्यावर पूर्णपणे बंदी आहे. 


सिनेमात दाखवत त्याप्रमाणे हातामध्ये तोफ घेऊन बॉम्ब उडवण्याची फॅशन लहान मुलांमध्ये पाहायला मिळते. याचे विपरित परिणाम होतात हे माहिती असून देखील लहान मुले तोफ हातात घेऊन बॉम्ब फोडण्याचे धाडस करतात. इंदौरच्या एअरोड्रोम परिसरातील 15 वर्षांचा गजेंद्र सोलंकी याचाच बळी ठरला. 


गजेंद्रने लोखंडी तोफेमध्ये सुतळी बॉम्ब पेटवला आणि स्फोटानंतर झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी गजेंद्रला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण तो शुद्धीवर आला नाही. गजेंद्रच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथून डॉक्टरांनी त्याला एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


गजेंद्र बंदिस्त तोफ डागायचा


गजेंद्र ज्या तोफेने गोळीबार करत होता त्यावर पूर्णपणे बंदी आहे. असे असूनही, अनेक मुले आणि तरुण याचा वापर करतात. ही तोफ लोखंडी पाईपपासून बनवलेली असते. पाईपच्या खाली असलेला स्टँड बंदुकीसारखा बनवलेला असतो. त्यात समोर बॉम्ब ठेवतात आणि स्फोट करतात.


गजेंद्रचे वडील सुतार आहेत. गजेंद्र हा नववीत शिकणारा आणि चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता.


कुटुंबीय शवविच्छेदनाला दिला नकार


रविवारी रात्री गजेंद्रचा मृतदेह एमवाय हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला होता. कुटुंबीय त्याचे पोस्टमॉर्टम करण्यास नकार देत होते. अशा अपघातांनंतर पीएम आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यानंतर त्यांनी होकार दिला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. 


बंदी असलेली तोफ कुठे सापडते?


गजेंद्र ज्या तोफेने गोळीबार करत होता त्यावर बंदी आहे. असे असूनही ही तोफ अनेकदा लहान मुलांच्या हातात दिसून येते. अशा तोफांची निर्मिती कोठून होते आणि त्या मुलांपर्यंत कशा पोहोचतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.