Corona : कोरोनाकाळात दूध पिऊन वाढवा इम्युनिटी...दूध पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी
आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते (milk will reduce the chance of heart attack )
Milk Benefits For Immunity: सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय, (corona new verient) शिवाय थंडीचा मौसम आहे, वातावरणात चांगलाच गारवा आहे , हवामान खात्याने इशारा दिलाय कि पुढच्या 2 दिवसात राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे (Maharashtra cold will intensify). त्यामुळे प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देत आहे.
आणखी वाचा: Maharashtra Weather News : राज्यात थंडी वाढणार, या आठवड्यात तापमान कसं असेल ते जाणून घ्या
दूध आपल्या प्रत्येकाच्या घरी असणारा पदार्थ आहे. आज आपण दुधाचे फायदे जाणून घेणार आहोत. (The health benefits of milk) दुधाचे सर्व फायदे तुम्हाला माहितच असावेत. दुधाला शरीरासाठी नेहमीच आवश्यक घटक मानले जाते. एवढेच नाही तर दूध हृदयरोगांचे आजार बरे करते, परंतु शरीरास आवश्यक पौष्टिकताही देखील प्रदान करते. परंतु नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एका ग्लास दुधाचे सेवन केल्याने शरीरास गंभीर हृदयरोगांपासून संरक्षण मिळते. ( benefits of milk)
आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. या संशोधनात दोन दशलक्ष अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता, ज्याचे निकाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
आणखी वाचा: Cholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
संशोधनात असे आढळले आहे की, जे दररोज एक ग्लास दुधाचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका 14 टक्के कमी होतो. तथापि, आतापर्यंत दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जात होते. (milk reduces chances of heart attack)
दररोज दूध पिणार्या लोकांचे बॉडी मास इंडेक्स सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. याकडेही संशोधनात लक्ष वेधले गेले आहे. कोलेस्टेरॉलची (cholestol) पातळी कमी केल्याने संशोधनास योग्य संबंध सापडला नाही. या संशोधनात अनेक विद्यापीठांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. (intake of milk will increse your immunity in this corona situation know the tips )
दुधाचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते. दूध शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे आणि प्रथिने देखील प्रदान करते. हा अभ्यास लठ्ठपणाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ज्याची जगभर चर्चा होत आहे.