Cholestrol Symptoms : आजकाल कामाचा ताण (work stress) वाढलाय , ऑफिसला वेळेवर पोहचण्यासाठी घाईघाईत आपण घरातून निघतो खाण्यापिण्याकडे आपलं लक्ष नसतं, मग आपण कधीतरी बाहेरचं खातो. बाहेरचं खाणं म्हणजे फुकटचं आजारपण आणि विविध व्याधींना आमंत्रण देणं. अश्यात आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागतो आणि सुरवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण हे सर्वात चुकीचं आहे, रोजच्या कामाच्या व्यापामध्ये आपलं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.
यावेळी योग्यवेळी चांगला आहार न घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये ब्लड शुगर, बीपीचा त्रास तसंच हृदयाच्या समस्यांची तक्रार वाढते. मुख्य म्हणजे या सर्वांमध्ये कोलेस्ट्रॉलचं (cholestrol) प्रमाण फार महत्त्वाचं असून तो एक उपयुक्त घटक मानला जातो. एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होत आपण रोजच्या आहारात पुरेसं खात नाही जे खातो ते हेल्दी (healthy lifstyle) नसतं. शिवाय आजकाल बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काहींना काही भेसळ ही केलेलीच
असते , नैसर्गिकरित्या पिकवलेली भाजी किंवा कुठलीही वस्तू आपल्याला सहज सहजी मिळतच नाही (cholestrol symptoms)
हार्ट अटॅक (heart attack) येण्यामागे महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कोलेस्टेरॉल. ज्यावेळी कोलेस्टेरॉल तुमच्या रक्ताच्या (cholestrol in blood ) माध्यमातून रक्त प्रवाहात येतं तेव्हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. (cholestrol and heart attack)
द अमेरिकन अकॅडेमी ऑफ डेर्मेटोलॉजी असोसिएशननुसार, काही प्रमाणात तुमची त्वचा तुमच्या शरीरात वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे संकेत देत असते. (symptoms of high cholestrol)
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात. त्याचप्रमाणे कोपर, गुडघे, हात, पायांचे तळवे आणि इतकंच नाही तर नाकावरही आढळतात. काही वेळा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांसारखे वाटल्याने या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं. मात्र कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर या पुळ्यांचा आकार मोठा होतो. अनेकवेळा त्यांच्यामुळे कोणतीही वेदना जाणवत नाही. (this body part will give you signs if your cholestrol increses gives you alert)
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील.