UPSC परीक्षेत ब्लु ट्युथवर उत्तरं विचारताना पकडला गेला ऑफिसर
तामिळनाडूमध्ये एक आयपीएस अधिकारी युपीएससीच्या मुख्य परिक्षेमध्ये कॉपी करताना रंगेहाथ पकडला गेला आहे.
चैन्नई : तामिळनाडूमध्ये एक आयपीएस अधिकारी युपीएससीच्या मुख्य परिक्षेमध्ये कॉपी करताना रंगेहाथ पकडला गेला आहे.
सफीर करीम नावाचा आयपीएस अधिकारी IAS/IFS साठी प्रयत्न करत होता. मात्र परिक्षेच्या वेळेस सफीर करीम ब्लु ट्युथवर बोलताना आढळला. ब्ल्यू टुथचा वापर करून तो पत्नीशी बोलता होता. सफीरची पत्नी त्याला काही उत्तरं डिक्टेट करत होती.
चेन्नई नयेथील एग्मोर गर्ल्स स्कूल हे सफीरचे परिक्षा केंद्र होते. जेव्हा परिक्षा निरीक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी पोलिसांनी सूचना दिल्या. त्यानंतर लगेजच सफीर आणि त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले. जर सफीरच्या विरोधात पुरावे सिद्ध झाले तर आईपीसी ४२० च्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
सफीर करीम हा कोच्ची येथील राहत होता. त्याची तामिळनाडू कॅडरमध्ये पोलिस विभागात नियुक्ती झाली होती. आइपीएसअधिकारी असलेला सफीर इंजिनीअर आहे. तिसर्यांदा परिक्षा दिल्यानंतर त्याला हे यश मिळाले होते.