IRCTC Hotel Booking: प्रवाशांना सातत्यानं नवनवीन सुविधा देणाऱ्या IRCTC कडून पुन्हा एकदा एक धमाकेदार Offer सर्वांसमक्षण आणण्यात आली आहे. तुम्हीही भटकंती करत असाल आणि विविध ठिकाणांवर किमान दरात कमाल आणि तितक्याच उत्तम सुविधा कशा मिळवायच्या याचा शोध घेण्यासाठी तुम्हीही तासनतास इंटरनेटवर फेरफटका मारत असाल, तर ही बातमी तुमच्याचसाठी. कारण, इथे मिळतेय Best Deal. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IRCTC कडून पुन्हा एकदा प्रवाशांसाठी एक खास भेट आणण्यात आली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका ट्विटमधून याबाबतची माहिती मिळतेय. जिथं तुम्हाला देशातील कोणत्याही शहरात हॉटेल बुक करण्याची मुभा देण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय? हे तर आधीही होत होतं. पण, इथे तुम्हाला एक खास सवलत मिळतेय ज्या माध्यमातून तुम्ही अविश्वसनीय दरांमध्ये Hotel Booking करू शकता. 


स्वस्तात हॉटेल बुकींस करण्यासाठी नेमकं काय करायचं? 


थ्री स्टार ते फाईव्ह स्टार रेटिंग असणारे हॉटेल बुक करण्यासाठी तुम्ही स्वत: पटेल त्या Payment Scale मधील पर्याय पाहू शकता जिथं, काही सवलतींमुळं हॉटेलच्या रुमचे दर आणखी कमी होतील. 


यासाठी https://www.hotel.irctctourism.com/hotel या संकेतस्थळाला भेट द्या. जिथं तुम्हाला विविध दरातील पर्याय दिसतील. या मेल आयडीवर IRCTC Railway बुकिंगसाठी वापरात असणारा आयडी आणि पासवर्ड तुम्ही इथं वापरू शकता. अन्यथा नव्यानं आयडी तयारही करु शकता. 


हेसुद्धा वाचा : IRCTC कडून आता पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, प्रस्ताव तयार


 


तुम्ही वरील संकेतस्थळावर गेलं असता तिथे अनेक पर्यायांमधून तुम्हाला आवडेल असा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला त्या हॉटेलबाबतची सर्व माहिती एका क्लिकवर अगदी सहजपणे मिळेल. इतकंच नव्हे, तर तुम्ही ज्या हॉटेलमध्ये रुम बुक करत आहात तेथील रुमच्या आतले फोटोही तुम्ही पाहू शकता. बुकींगचे दर, जीएसटी या आणि अशा अनेक गोष्टींबाबतची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर तुम्ही रुम बुक करू शकता. पुढे Payment Mode साठी तुमच्याकडे Credit Card, Debit Card, UPI किंवा E Wallet असे पर्याय उपलब्ध असतील. 


आता मनाजोगं हॉटेल शोधणं आणखी सोपं.... 


कुठेही लांबच्या आणि त्यातही मुक्काम असणाऱ्या प्रवासाला जायता बेत आखल्यानंतर लगबग सुरु होते ती म्हणजे हॉटेल बुकिंगची. पण, प्रत्येक वेळी तुम्हाला हवं तसंच हॉटेल किंवा तत्सम सुविधा मिळेल असं नाही. अशा परिस्थितीमध्ये मग नाईलाजानं काही गोष्टींमध्ये तडजोड करत हाताशी असणाऱ्या पर्यायायांमधूनच हॉटेल निवडावं लागतं. पण, आयआरसीटीसीच्या नव्या सुविधेमुळं ही अडचणही दूर होणार आहे.