अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. गुजरातमधील साबरमती येथे हा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बुलेट ट्रेनच्या कामासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चापैकी महाराष्ट्र आणि गुजरात सरकार प्रत्येकी २५ टक्के वाटा उचलणार आहे. तर, केंद्र सरकार ५० टक्के देणार आहे. त्यासोबतच या प्रकल्पासाठी ८८ हजार कोटी रुपये जपानं कर्ज म्हणून देणार आहे तेही फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर.


नमस्कार म्हणत पंतप्रधान शिंजो आबेंनी भाषणाला सुरुवात केली. 'जपान आणि भारत आशियातील मोठी लोकशाही आहे. जपानच्या कंपन्या भारतासाठी प्रतिबद्ध आहेत. मोदी माझे दुरदर्शी मित्र आणि नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू इंडियाचा संकल्प केला आहे, पंतप्रधान मोदी यांनी या संकल्पात जपानला आपला पार्टनर म्हणून निवडलं आहे. आम्ही याचं संपूर्णपणे समर्थन करु. जर भारत-जापान सोबत काम करतो तर काहीही अशक्य नाही. मी गुजरात आणि भारताला पंसद करतो. भारतासाठी जे पण शक्य होईल ते मी करेल. मला अशी आशा आहे की पुढच्या वेळी जेव्हा मी येईल तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मी बुलेट ट्रेनमध्ये बसून येईल.' असं म्हणत त्यांनी शेवटी जय इंडिया, जय जपानचा नारा दिला.