युट्यूबर अरमान मलिक हा दोन लग्न केलं म्हणून त्यावर समाजातून टीका होतेय. पहिल्या बायकोला घटस्फोट न देता त्याने दुसर लग्न केलं. हिंदू धर्मात एक बायको असताना घटस्फोट न घेता तुम्ही दुसर लग्न करु शकत नाही. त्यामुळे अरमान मलिकने धर्म न बदलता दोन लग्न केलं. पण थांबा अरमान मलिक नाही तर एका पठ्ठ्याने दोन नाही तर तब्बल 5 लग्न केलं आहे. सोशल मीडियावर ही पठ्ठ्याचा कारनामा व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा पराक्रम सीआरपीएफ कॉन्स्टेबलने केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया हँडलवर एक ट्विट व्हायरल झालं असून त्यात एक पत्र पोस्ट करण्यात आलंय. हे पत्र सीआरपीएफ कॉन्स्टेबल हरेंद्र राम यांच्याशी कारनामाच आहे. हरेंद्र राम यांनी तब्बल पाच वेळा लग्न केलं असून त्याला पाच बायका आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल त्याने 14 वर्षात 5 लग्न केलीय. धक्कादायक म्हणजे या लग्नाची भनक ना त्याच्या अधिकाऱ्यांना ना त्याच्या कुठल्याही पत्नी आणि कुटुंबाला होती. त्याचा या पाच लग्नाचा भानगंड चौथ्या पत्नीने केलीय. 


सीआरपीएफच्या कारवाईशी संबंधित एका पत्रानुसार हे सत्य सगळ्यांसमोर आलंय. या पत्रात पुढे असं लिहिण्यात आलंय की, 'कॉन्स्टेबल हरेंद्र रामने त्याची पहिली पत्नी जिवंत असताना एकापेक्षा जास्त वेळा त्याने लग्न केलंय. 29 नोव्हेंबर 2021 ला त्याची पाचवी पत्नी निशा कुमारशी लग्न झालंय. या लग्नाबद्दल त्याने विभागाला माहिती दिली नाही, किंवा त्याची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे हवालदार हरेंद्र रामची चौथी पत्नी खुशबू कुमारी हिने 09 बटालियनला दिलेल्या तक्रारीत जवानांच्या इतर पत्नींचा तपशील आणि त्यांच्यासोबतच्या लग्नाची तारीखही दिल्या आहेत. 


चौथ्या बायकोने फोडलं भांड!


या व्हायरल झालेल्या पत्रानुसार हवालदार हरेंद्र रामच्या कृत्यांचा पर्दाफाश त्याची चौथी पत्नी खुशबू कुमारी हिने केलीय. खुशबूनेही या पत्रात सांगितलं की, हरेंद्र रामने पहिलं लग्न 20 मे 2008 ला रिंकी कुमारशी केलं होतं. यानंतर दुसरा लग्न 16 मे 2010 रोजी कविता कुमारीसोबत, तिसरा लग्न अनिता कुमारीसोबत 19 ऑगस्ट 2014 ला, चौथ लग्न तक्रारदार खुशबू कुमारीसोबत 8 मे 2017 ला आणि पाचव लग्न निशा कुमारीसोबत 30 नोव्हेंबर 2021 ला केलंय. त्यामुळे त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आलीय. 



हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. त्यानंतर यावर कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका यूजरने लिहिलंय, 'कॉन्स्टेबल जीडी हरेंद्र राम, 5 बायका असलेला पती. ही देखील एक आठवण असेल. हा सैनिक सीआरपीएफ दलातील वारसा म्हणून ओळखला जाईल.' दुसऱ्या युजरने लिहिलंय की, 'जर हे गुप्त उघत झालं नसतं तर तो शतकाच्या जवळपास गेला असता.'