रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला भाजप आघाडीवर होता मात्र काही वेळाने काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने मुसंडी मारली आहे. त्यामुळे झारखंडच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंता हाती आलेल्या निकालानुसार भाजप पिछाडीवर आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठ्या पक्षाच्या रुपात येत असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत अतिशय काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आजसू प्रमुख सुदेश महतो या निवडणुकीत किंग मेकरची भूमिका साकारत आहेत. (झारखंड विधानसभा मतमोजणी 2019 : झारखंडमध्ये भाजपचं पानिपत, काँग्रेस-झामुमोची मुसंडी)  


असं म्हटलं जातं की, सुदेश महतो झारखंडच्या राजकारणातील अनुभवी खेळाडू आहे. अवघ्या 25 वर्षांचे असताना सुदेश महतो पहिल्यांदा आमदार बनले. आता 45 वर्षीय सुदेश महतो राजकारणाकडे बारकाईने पाहत आहेत. आतापर्यंत झारखंड राज्यात कुणाचेही सरकार आले तरी सुदेश महतो यांचा त्या सरकारमध्ये महत्वाचा वाटा राहिला आहे. (झारखंड विधानसभा निवडणूक 2019 : रघुवर दास तोडणार का रेकॉर्ड) 


 


यामुळेच सुदेश महतो यांना झारखंडच्या राजकारणात किंग मेकर म्हटलं जातं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत जागांचे गणित नीट न जुळल्यामुळे सुदेश महतो यांनी आपला पक्ष आजसूला घेऊन एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला. मात्र अशी देखील चर्चा आहे की, निकालानंतर सुदेश महतो भाजपला सरकार बनवण्यासाठी मदत करू शकतात. (झारखंडमध्ये बहुमताचं सरकार; भाजपचा दावा) 


 


सुदेश महतो 2000,2005,2009 आणि 2014 विधानसभा निवडणुकीत सिल्ली विधानसभेतून विजय मिळवला आहे. सिल्ली विधानसभा मतदारसंघात सुदेश महतो यांनी भरपूर मान-सन्मान आहे. तेथे त्यांना 'दादा' करून संबोधलं जातं.