झारखंड विधानसभा निवडणूक 2019 : रघुवर दास तोडणार का रेकॉर्ड

भाजपची विजयाकडे वाटचाल 

Updated: Dec 23, 2019, 09:55 AM IST
झारखंड विधानसभा निवडणूक 2019 : रघुवर दास तोडणार का रेकॉर्ड  title=

रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. सुरूवातीपासून भाजपला आघाडी मिळत असल्याचं पाहण्यात आलं. दुपारपर्यंत मतमोजणीच्या निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. झारखंडच्या मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

संपूर्ण निकालाबरोबरच सगळ्यांचे लक्ष रघुवर दास 19 वर्षांपासून चालत आलेल्या रेकॉर्डला मोडणार का? याकडे आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे एक रेकॉर्ड आहे. कोणताही विदयमान मुख्यमंत्री आतापर्यंत विधानसभा निवडणूक चिंकलेले नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष हे रघुवर दास यांच्या निकालाकडे आहे. रघुवर दास हा रेकॉर्ड मोडणार का? (झारखंड विधानसभा मतमोजणी 2019 : झारखंडमध्ये त्रिशंकू अवस्थेकडे वाटचाल) 

 

2014 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या पदरी निराशा 

आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत एक ट्रेंड पाहायला मिळाला तो म्हणजे सर्व विद्यमान मुख्यमंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वाधिक धक्कादायक होते. या निवडणूकीत चार माजी मुख्यमंत्र्यांना पराजयाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता संपूर्ण देशाचा निकाल हा रघुवर दास यांच्याकडे आहे. रघुवर दास हा रेकॉर्ड मोडित काढणार का?

पहिल्यांदाच पाच वर्षांचा कार्यकाळ 

रघुवर दास झारखंडचे पहिले असे मुख्मंत्री आहेत ज्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. तसेच गेल्या सहा वेळेपासून रघुवर दास जमशेदपूरमधून निवडणून येत आहे. यावेळी रघुवर दास यांना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सरयू राय यांची मोठी टक्कर मिळाल्याची पाहायला मिळाली.