झारखंड निवडणूक निकाल 2019 LIVE : भाजपचे पानिपत, काँग्रेस-झामुमोची मुसंडी

झारखंड निवडणूक निकाल 2019 :  भाजपची सत्ता गेली, काँग्रेस-झामुमोची मुसंडी

Updated: Dec 23, 2019, 01:11 PM IST
झारखंड निवडणूक निकाल 2019 LIVE :   भाजपचे पानिपत, काँग्रेस-झामुमोची मुसंडी title=

रांची : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांवरील मतमोजणीला (Jharkhand Assembly Election Result 2019) सुरुवात झाल्यानंतर निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला. मात्र, काँग्रेस-झामुमोने जोरदार आघाडी घेत भाजपवर मात केली आहे.  या निवडणुकीत मुख्यमंत्री रघुवीर दास ( Raghubar Das)  यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचे दिसत आहे. तर हेमंत सोरेन ( Hemant Soren) हे मुख्यमंत्री होणार असे दिसून येत आहे. 

निकालाचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार असले तरी सुरूवातीच्या कलमध्ये भाजप पिछाडीवर आहे. राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले.  यात ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असणार आहे. एकूण २४ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. १ हजार २१५ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

मतमोजणी 28 फेऱ्यांमध्ये होणार असून सर्वात कमी दोन फेऱ्या चंदनकियारी आणि तोरपा जागांवर होणार आहे. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत पाच फेऱ्यांमध्ये मतदान झाले होते. सर्व जागांवरील मतदान हे ईवीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. 

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे LIVE UPDATES 

* भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे - राऊत 
भाजपनं महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं - राऊत 

* हा निकाल अंतिम नाही. मतमोजणीच्या 16 ते 18 फेऱ्याच झाल्या आहेत. त्यामुळे निकाल्यावर आता प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही, अशी प्रतिक्रिया झारखंडचे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार रघुवर दास यांनी दिली आहे. 

* झारखंडमध्ये राष्ट्रवादीलाही एक जागा 
काँग्रेस - झामुमोची जोरदार मुसंडी 

*सरकार भाजपचं असणार - रघुवर दास 

 झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची डुमका आणि बऱ्हेट या दोन्ही जागांवर आघाडी

* झारखंडमध्ये भाजपच्या सत्तेला सुरूंग,  काँग्रेस 11 तर झामुमोला 3 जागांवर आघाडी 

सकाळी 10.36 : झारखंडमध्ये भाजपच्या सत्तेला सुरूंग?

काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर 
भाजप 31 जागांवर पिछाडीवर 
काँग्रेस - झामुमो बहुमताच्या उंबरठ्यावर 

 

सकाळी 10.20 :  काँग्रेस - झामुमोची पुन्हा मुसंडी 
                          35 जागांवर आघाडी 
                          सत्तेच्या जाव्या मात्र एजेएसयूच्या हाती 

सकाळी 10.03 : झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रघुवर दास 342 मतांनी आघाडीवर 

सकाळी 10.02 : हेमंत सारेन 664 मतांनी आघाडीवर

सकाळी 9.43 :  निकालाचे चित्र बदलले, भाजप ३५ जागी आघाडीवर

सकाळी 9.42 : निवडणूकीच्या निकालाचे ताजे अपटेड 

सकाळी 9.30 : झारखंडमध्ये त्रिशंकू अवस्थेकडे वाटचाल 
सत्तेच्या चाव्या एजेयूएच्या हाती 
भाजपने अनेक जागांवर आघाडी 

सकाळी 9.23 :  बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता

सकाळी 9.17 : 81 जागांपैकी 71 जागांचे कल हाती, काँग्रेस-आघाडीची 40 जागांवर मुसंडी, भाजपला धक्का

सकाळी 9.13 : मनिकामे काँग्रेस उमेदवार आघाडीवर 
धनबादमध्ये भाजपचे राज आघाडीवर 
देवघर भाजपचे रणधीर सिंह आघाडीवर 

सकाळी 9.11 : झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांची डुमका आणि बऱ्हेट या दोन्ही जागांवर आघाडी

सकाळी 9. 01 : डुमकामधून झी मीडियाचे सौरभ शुक्ला यांची लाईव्ह माहिती 
झारखंडमध्ये सत्तातराचे वारे 
काँग्रेस-झामुमोला बहुमताचा आकडा गाठण्याची संधी 
काँग्रेसने या निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका साकारली 
31 जागांवर काँग्रेसने उमेदवार निवडले होते 

सकाळी 9.00 भाजपच्या सत्तेला सुरूंग 

काँग्रेस - झामुमोला 37 जागांवर आघाडी 
काँग्रेस - झामुमोला बहुमताची आघाडी 
भाजप मोठ्या फरकाने पिछाडीवर 

सकाळी 8.56 : झारखंडमध्ये सत्तांतर अटळ

भाजपकडून पाचवं राज्य हातातून जाणार 

सकाळी 8.50 : निकाल हाती येण्याअगोदरच झारखंडमध्ये पोस्टर पॉलिटीक्स 

सकाळी 8.46 : राजद 2 जागांवर आघाडी 

सकाळी 8.38 : भाजप 23 जागांवर आघाडीवर 

सकाळी 8.35 : अपक्ष 4 जागांवर आघाडी 

सकाळी 8.30 : काँग्रेस, झामुमोची 37 जागांवर मुसंडी
                       काँग्रेस- झामुमोची जोरदार मुसंडी
                       भाजप मोठ्या फरकाने पिछाडीवर

सकाळी 8.27 : डुमका येथील एका मजमोजणी केंद्राबाहेरील दृश्य

सकाळी 8.18 : भाजप 8, झामुमो 11, काँग्रेस 2, राजद 1 जागांवर आघाडीवर 

सकाळी 8.17 : भाजप 8 जागांवर तर झामुमो 11 जागांवर आघाडीवर 

सकाळी 8.15 : भाजपला 6 जागांवर आघाडी 

सकाळी 8.12 :  झामुमोला 4 जागांवर आघाडी 

सकाळी 8.11 : काँग्रेसला एका जागेवर आघाडी 

सकाळी 8.10 : झाविमाचे बाबूलाल मरांडी आघाडीवर 

सकाळी 8.06: भाजपला एका जागेवर आघाडी 

सकाळी 8.05 : यावेळी देखील रघुवर दास मोडणार का रेकॉर्ड?

सकाळी 8.03 : 81 जागांवर मतमोजणीला सुरूवात 
                       1,215 उमेदवारांच भवितव्य ठरणार 

सकाळी 8 वाजता : 

महत्वाचे मुद्दे 

- बाबूलाल मरांडी यांच्या जेव्हीएम आणि सुदेश महतो यांच्या एजेएस पक्षाला किती जागा मिळतात याकडे लक्ष असेल.
- भाजप आणि एजेएस यांची युती तुटल्याचा फटका भाजपला बसेल का हे देखील स्पष्ट होणार आहे.
- या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसतेय.

- २०१४ च्या निवडणूकीत भाजपला ३७ तर झारखंड मुक्ती मोर्चा १९ आणि काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज एक्झीट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.