झारखंडमध्ये बहुमताचं सरकार; भाजपचा दावा

६० ते ६५ हून अधिक जागा येण्याचा भाजपला विश्वास

Updated: Dec 23, 2019, 11:22 AM IST
झारखंडमध्ये बहुमताचं सरकार; भाजपचा दावा title=
फाईल फोटो

रांची : भाजपचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येण्याचा दावा केला आहे. सोबतच त्यांनी भाजपच्या राज्यात ६० ते ६५ हून अधिक जागा येण्याचं आपलं लक्ष्य पूर्ण करण्यात पक्षाला यश येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

लक्ष्मण गिलुआ यांनी लोकसभेच्या एक्झिट पोलचा हवाला देत, यावेळीचा एक्झिट पोल त्यांनी नाकारला आहे. एक्झिट पोलच्या सर्व्हेहून त्यांचा सर्व्हे अधिक विश्वसनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण झारखंडमध्ये जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवत भाजपलाच मत दिलं आहे. यावेळीही राज्यात भाजपचं सरकार येण्यापासून कोणीही थांबवू शकत नसल्याचं ते म्हणाले.

निवडणुकांच्या दरम्यान केंद्र सरकारने नागरिकता कायदा लागू केला. दोन्ही सभागृहात विधेयकाला मंजुरी देण्यात आली, याचाही फायदा भाजपला होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लक्ष्मण गिलुआ यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. खोटं राजकारण करणाऱ्या कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मुस्लिमांना घाबरवण्याचं आणि नागरिकत्व कायद्याविरोधात लोकांना भडकवण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु शिक्षित, जागरुक लोक काँग्रेसच्या बोलण्यात आले नसून सर्वांनी नागरिकता सुधारणा कायद्याचं समर्थन केलं आहे. भाजपला यासाठीही मत मिळाली असल्याचं ते म्हणाले.