नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहेत. आतापर्यंत बरेच निकाल हाती आले आहेत. झारखंडमध्ये गेली 5 वर्षे भाजपचे सरकार होते. पण आताच्या निकालात हे चित्र पालटताना दिसणार आहे. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये ही भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही? असे चित्र दिसत आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी म्हटलं की,'भाजपच्या रघुवर दास यांचं गेले 5 वर्षे सरकार होतं. ते सरकार पुन्हा या निवडणुकीत सहज येईल असं मला वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एवढी ताकद लावली तरीही देखील झारखंडचा निकाल हा त्रिशंकू आहे आणि ती त्रिशंकूच राहिल. आता तिकडे कोणतं पॅटर्न येतं म्हणजे महाराष्ट्र पॅटर्न येतं का हे संध्याकाळपर्यंत कळेल. भाजपचं नुकसान तर झालंच आहे.' (झारखंड विधानसभा मतमोजणी 2019 : झारखंडमध्ये भाजपचं पानिपत, काँग्रेस-झामुमोची मुसंडी)  


झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस आणि झारखंड मुक्त मोर्चा हे दोन पक्ष आघाडीवर असताना दिसत आहेत. या दोन्ही पक्षांनी खूप चांगली मुसंडी मारली आहे. त्यामुळे झारखंडमध्ये भाजप सत्तेला सुरूंग लागण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे.  (झारखंड विधानसभा निवडणूक 2019 : रघुवर दास तोडणार का रेकॉर्ड) 


झारखंड निवडणुकीकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भरपूर मेहनत घेतली होती. मात्र त्याचा फार फरक पाहायला मिळाला नाही. झारखंड निवडणुकीच्या वेळी भाजप सरकारने घेतलेले निर्णय फार बदल करू शकले नाहीत हे स्पष्ट होत आहे.