Jija Sali news: आजकाल समाजात अनेक धक्कादायक प्रकार हे घडतं असतात. त्यातून प्रेमसंबंध (Love Affair) आणि लग्न, विवाह अशांमधूनही अनेक गैरप्रकार समोर येतात. प्रेमासाठी जबरदस्ती लग्न करून घेणे अशा प्रकारांमुळे कायमच मुलींना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गावात आपल्याच पत्नीच्या बहीणीशी तिला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्याशी लग्नाच खाट मांडला आहे. चित्रकूट येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पुरूषाने आपल्याच अल्पवयीन मेहूणीला (Sali and Jija) नशेचे लाडू खायला घातले आणि तिचे अपहरण केले. नंतर तिला मंदिरात घेऊन गेल्यावर तिच्याशी लग्नाचा थाट मांडला. सध्या हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या प्रकरणी पीडित महिलेने न्यायासाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे. (jija sali crime news Jiju stopped her brother-in-law who was going to college gave her sleeping pill and got married)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा इसम गुजरात येथील अहमदाबाद येथे नोकरी करत होता. पीडित महिलेनं सांगितले की ती रायपूर पोलिस स्टेशन नजिक अत्रौली गावातील रहिवासी आहे आणि कृषक इंटर कॉलेजमध्ये नववीत शिकत आहे. 12 ऑक्टोबर रोजी कॉलेजला(College News Today) जाताना तिचा मेहूणा अवधेश केसरवाणी हा बसला या गावाजवळ चारचाकी गाडीत आपल्या कुटुंबीयांना भेटला आणि मला तुझ्यासोबत कॉलेज सोडू दे असे म्हणत गाडीत बसला.  


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?


पीडिता गाडीत बसताच तिला त्याने लाडू खायला दिले आणि ते लाडू खाऊन ती अचानक बेशुद्ध झाली. परंतु तिला बेशुद्ध झालेले पाहून अवधेशनं तिला काही कॉलेजमध्ये सोडले नाही आणि त्यावरून तिला त्याने साडी नेसून मंदिरात नेले आणि जर ती बोलली तर तिला जीवानीशी मारेन अशी धमकी दिली. 


लग्नानंतर पीडितेला खजुरिया कला गावातील तिच्या घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि त्यानंतर रात्री 8 वाजता तिला अत्रौली गावाबाहेर सोडले. तेथे पीडितेने घरी पोहोचून तिच्या आईला घटनेची माहिती दिली. ज्याची माहिती पीडितेच्या आईने आपल्या पती आणि मुलाला अहमदाबाद येथे फोनवरून दिली. पीडितेचे वडील आणि भाऊ अहमदाबादहून आले आणि त्यांनी रायपुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती दिली. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने नाराज झालेल्या पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह बुधवारी जिल्हा मुख्यालय कारवी गाठून अधीक्षकांना घटनेची संपुर्ण माहिती दिली. (Crime news)


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


अवधेश किसरवाणीवर गुन्हा दाखल - पीडित महिलेचे वडील आणि भावाने अवधेश केसरवानी आणि त्याच्या नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मंदिरात जबरदस्तीने लग्न केल्याचा आरोप केला आहे. आरोपी अवधेश केसरवाणी व त्याच्या नातेवाईकांवर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची मागणी पीडितेच्या भाऊ व वडिलांनी पोलिसांकडे विनवणी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार मंदिरातील विवाह सोहळ्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा फोटोही अर्जासोबत जोडण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांच्याकडे न्यायाची मागणी करण्यात आली आहे.