Kanchenjunga Express Accident In Darjeeling: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दार्जिलिंग जिल्ह्यामधील न्यू जलपायगुडी येथे रंगापानी स्थानकाजवळ कंचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनला मालगाडीनं जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. तसेच या अपघातात 60 प्रवासी जखमी झाले आहेत. तातडीनं बचाव पथकं आणि मदतकार्य करणारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेसंदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. (येथे क्लिक करुन पाहा भीषण अपघाताचे धक्कादायक फोटो)


अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक पोलीस निरिक्षकांना घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती ममता बॅनर्जींनी दिली आहे. रुग्णवाहिका, डॉक्टर आणि मदतकार्यासाठी बचाव पथकेही घटनास्थली पाठवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर मतदाकार्य सुरु आहे. रंगापानी स्थानकाजवळ हा अपघात झाला असून रेल्वेमंत्री अश्विवी वैष्णव यांनीही या अपघातासंदर्भात शोक व्यक्त केला आहे. रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे.


रेल्वेच्या बचाव पथकांबरोबरच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या मदतकार्यसाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 



दार्जिलिंग पोलिसांनी दिली माहिती


घटनास्थळी पोहोचले दार्जिलिंगचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "घटनास्थळावरील परिस्थिती चिंताजनक आहे. एक मालवाहू ट्रेन कांचनजंगा एक्सप्रेसवर आदळल्याने हा अपघात झाला."


नक्की वाचा >> भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायम


या ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, "मी बी 1 डब्यातून प्रवास करत होतो जेव्हा ट्रेनचा अपघात झाला. मला बाहेर काढण्यात आलं असून माझ्या डोक्याला मार लागला आहे," असं सांगितलं. 



हेल्पलाइन क्रमांक जारी


रेल्वेने या अपघाताची माहिती प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी तातडीने एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केलं असून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.



हा ट्रेनचा अपघात एवढा भीषण होता की अनेक डबे एकमेकांवर चढल्याचं चित्र घटनास्थळी आहे. दुर्घटनेनंतर ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशाच्या किंकाळ्यांचे आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. या अपघातामध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.