Kanchenjunga Express Accident: काही फूट हवेत ट्रेनचा डबा, किंकाळ्या अन्..; पहा कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे 10 फोटो

Kanchenjunga Express Accident Photos: हा अपघात घडल्यानंतर अपगातग्रस्त ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत असल्याचं प्रत्यक्षदर्शिंनी म्हटलं आहे. घटनास्थळावरील धक्कादायक फोटो आता समोर आले आहेत. 

| Jun 17, 2024, 17:22 PM IST
1/10

Kanchenjunga Express Accident Photos

पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

2/10

Kanchenjunga Express Accident Photos

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामधील न्यू जलपायगुडी स्थानकाजवळ कंचनजंगा एक्स्प्रेसला हा अपघात झाला आहे.  

3/10

Kanchenjunga Express Accident Photos

अपघात एवढा भीषण होता की कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनचा एक डबा थेट काही फूटवरपर्यंत वर गेल्याचं घटनास्थळी दिसत आहे.   

4/10

Kanchenjunga Express Accident Photos

कंचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनला मालगाडीनं जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  

5/10

Kanchenjunga Express Accident Photos

या अपघातात अनेकजण जखमी झाले असून प्राथमिक माहितीनुसार 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

6/10

Kanchenjunga Express Accident Photos

कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने मागून जोरदार धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.  

7/10

Kanchenjunga Express Accident Photos

या अपघातामध्ये कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनचे तीन डब्बे रुळावरुन उतरल्याचं दिसत आहे.  

8/10

Kanchenjunga Express Accident Photos

दुर्घटनेनंतर ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशाच्या किंकाळ्यांचे आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.  

9/10

Kanchenjunga Express Accident Photos

अपघाताची माहिती मिळताच तातडीनं बचाव पथकं आणि मदतकार्य करणारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  

10/10

Kanchenjunga Express Accident Photos

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेसंदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.