Kedarnath Yatra 2023​: मागील दोन वर्ष कोरोनामुळे केदारनाथ (Kedarnath), चारधाम यात्रा बंद होती. त्यामुळे येथील व्यवसावर मोठा परिणाम झाला होता. अशातच आता महाशिवरात्रीला (Mahashivratri) केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख (Kedarnath Opening Date) निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दोन महिन्यांनंतर म्हणजे 25 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता बाबा केदारनाथचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. (kedarnath dham doors opening date fixed on mahashivratri 2023 news in marathi)


अशी ठरते तारीख -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओंकारेश्वर मंदिरात (Omkareshwar Temple) पहाटे 4 वाजल्यापासून महाभिषेक पूजेला सुरुवात झाली. मंदिरातील पुजारी शिवशंकर लिंग, बागेशलिंग, गंगाधरलिंग आणि शिवलिंग यांनी गर्भगृहात सर्व विधी धार्मिक विधीनुसार पार पाडल आहेत. सकाळी साडेआठ वाजता भगवान केदारनाथची आरती करून भोग अर्पण करण्यात आला. आचार्य पंचांग गणनेसाठी पंचकेदार बैठकीला आले. त्यानंतर तारीख निश्चित करण्यात आली.


बद्रीनाथ धामची तारीख ठरली


पंचांग गणनेच्या आधारे साडेनऊ वाजता केदारनाथचे पोर्टल उघडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला आणि त्याची घोषणा करण्यात आली. जगप्रसिद्ध बद्रीनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजे यावर्षीही 27 एप्रिल रोजी सकाळी 7.10 वाजता उघडले जातील. बसंत पंचमीच्या (Basant Panchami) शुभ मुहूर्तावर धामचे द्वार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.


आणखी वाचा - Kedarnath Yatra : घाई नको... श्रद्धाळूंच्या भक्तीवर हवामानाचा मारा; पुन्हा थांबली केदारनाथ, यमुनोत्री यात्रा


2022 मध्ये 17 लाख 60 हजार 646 भाविकांची गर्दी


दरम्यान, गेल्या वर्षी 17 लाख 60 हजार 646 भाविक बद्रीनाथ धाममध्ये पोहोचले होते. त्यामुळे मागील वर्षी विक्रमी गर्दी पहायला मिळाली होती. 22 एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. गंगोत्री धामचे (Gangotri Dham) दरवाजे 22 एप्रिलला उघडले जाणार आहेत. त्यामुळे आता भाविक आतुरतेने वाट पाहत असल्याचं पहायला मिळतंय.