Kedarnath Yatra : घाई नको... श्रद्धाळूंच्या भक्तीवर हवामानाचा मारा; पुन्हा थांबली केदारनाथ, यमुनोत्री यात्रा

प्रशासनाकडून यात्रेच्या विविध थांब्यांच्या ठिकाणी सध्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला जात आहे

Updated: May 25, 2022, 08:15 AM IST
Kedarnath Yatra : घाई नको... श्रद्धाळूंच्या भक्तीवर हवामानाचा मारा; पुन्हा थांबली केदारनाथ, यमुनोत्री यात्रा  title=

मुंबई : केदारनाथ परिसरात सलग सात तास झालेली बर्फवृष्टी आणि मैदानी भागांमध्ये झालेल्या पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशीही यात्रा थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. यादरम्यान, केदारधाम येथे असणाऱ्या भाविकांना मैदानी भागांमध्ये स्थलांतरितही करण्यात आलं. प्रशासनाकडून यात्रेच्या विविध थांब्यांच्या ठिकाणी सध्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला जात आहे. (Kedarnath yatra)

तिथं पावसाचा इशारा आणि हवामानाचे एकंदर तालरंग पाहता यमुनोत्री यात्राही थांबवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी केदारनाथ यात्रा सुरुझाली, तेव्हा सोनप्रयागहून 6500 श्रद्धाळूंनी पायवाट मार्गानं मंदिर रोखानं प्रवास सुरु केला. (Chardham Yatra kedarnath badrinath gangottri yamunotri rain alert )

सोनप्रयागसहित केदारघाटी परिसरातही यावेळी रिमझिम पाऊस सुरुच होता. पुढेही यात्रेकरुंचा ओघ हजारोंच्या संख्येनं सुरुच होता. यादरम्यान, पावसाचा जोर वाढल्यामुळं सोनप्रयाग येथे मात्र यात्रा थांबवण्यात आली. 

तिथे उत्तरकाशीमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळं प्रशासनानं  यमुनोत्री यात्राही थांबवण्याचा निर्णय हेतला. जानकीचट्टी येथे ही यात्रा थांबवण्यात आली. आता वातावरणात सकारात्मक बदल दिसल्यानंतर यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये केदारनाथ आणि एकंदरच चारधान यात्रेला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचं लक्षात येत आहे. लॉकडाऊननंतर श्रद्धाळूंचे पाय या ठिकाणांकडे वळले आहेत. पण, यामध्ये हवामानाचा मारा मात्र प्रत्येकाचीच यात्रा खडतर करत आहे हे नाकारता येत नाही.