मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate 17 May 2021) दिवसाप्रमाणे सकाळी जाहीर झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज वाढवल्या नाहीत. पेट्रोल डिझेलचे आधीचे दर स्थिर ठेवण्यात आलेयत. 16 मे ला कंपन्यांनी पेट्रोल 24 पैसे प्रतिलीटर तर डिझेल 27 पैसे प्रति लीटर महाग केले होते. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, 17 मे 2021 रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price today in Delhi) 92.58 रुपये आणि डिझेलची किंमत 83.22 रुपये कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोलची किंमत 98.88 रुपये आणि डिझेलची किंमत 86.06 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 92.67 रुपये आणि डिझेलची किंमत 86.06 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Diesel Price Today) 94.34 रुपये आणि डिझेलची किंमत 88.07 रुपयांवर स्थिर राहीली.



दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.