General Knowledge :  तुम्ही कधी हे नोटीस केलंय का की बॉलपेनच्या झाकणाला वरती होल असतो. बरं ते हॉल कशासाठी दिल असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का ?  याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?


पेनाच्या झाकणाला होल का असतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर अनेकांची उत्तरे असतील की पेनाची शाई सुकू नये म्हणून झाकणावर होल असतो. किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे या मागे नेमकं काय कारण आहे हे माहितीसुद्धा नसेल. 


चला तर मग जाणून घेऊया यामागील नेमकं कारण 


आपल्यापैकी कितीतरी जण असे आहेत ज्यांना काम करत असताना पेन तोंडात घालण्याची सवय असते. काही जण तर पेन नुसता तोंडात घालत नाहीत तर तो कचाकचा चावत बसतो. तसं पाहिलं तर ही वाईट सवय आहे. 


बॉल पेनच्या झाकणावर होल का असतं यामागील मुख्य कारण म्हणजे, अनेकदा पेनाचे झाकण लोक तोंडात घालतात. विशेष करुन लहान मुलं जर चुकून पेनाचं झाकण तोंडात अडकलं तर काय याचा विचार केलाय का कधी ? 


आणखी वाचा: नखं चावण्याची सवय सुटत सुटेना ? या टिप्स मदत करतील..


जर पेनाचं टोपण चुकून तुम्ही गिळला तर थेट तुमच्या श्वसननलिकेत अडकू शकतो आणि तुमचा श्वास गुदमरून तुमचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते. अशा वेळी पेनाच्या या टोपणातून हवा आरपार जावी यासाठी त्याला एक छिद्र देण्यात आलेले असते.


जेणेकरून जर तुमच्या घशात टोपण अडकलं तर त्या छिद्रातून हवा आरपार जाईल आणि तुमचा श्वास गुदमरणार नाही.  (​Know why there is hole in ball pen interesting fact in marathi )


पण म्हणून तोंडात पेन घालण्याची सवय असेल तर ताबडतोब थांबवा कारण, प्रत्येकवेळी ही गोष्ट मदत करेलच असं नाही. तसं पाहिलं तर कोणतीही वस्तू तोंडात घालणं हे वाईटचं. वस्तू उघड्यावर असतात त्यावर अनेक बॅक्टरीया बसलेले असतात. अशा वस्तू तोंडात घातल्याने आपल्या तोंडावाटे अनेक जंतू आपल्या शरीरात जातात आणि त्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता असते. (Know why there is hole in ball pen interesting fact in marathi )