Lockdown Marriage : कोविड (Covide -19) काळात अनेक जोडप्यांना अनोख्या पद्धतीनं लग्न केल्याचे आपण पाहिलंच असेल. पण याच काळात केलेल्या लग्नबंधनात अडकलेल्या जोडप्यांना आता एका समस्येला सामोरं जावं लागत आहे. कोलकातामध्ये (Kolkata) लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान लग्न झालेल्या किमान 15 जोडप्यांना पुन्हा लग्न करावे लागणार आहे. कोलकाता आणि आजूबाजूला राहणारी अशी 15 जोडपी आहेत ज्यांच्या विवाह प्रमाणपत्रात (Marriage Certificate) त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या जोडप्यांना आता पुन्हा लग्न करावं लागणार आहे.  मात्र, त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा मार्ग सोपा असणार नाही. या लोकांना जिल्हा न्यायालयात जाऊन त्यांचे लग्न रद्द करावे लागेल. यानंतर पुन्हा लग्न केल्यानंतर नवीन कागदपत्रे तयार करावी लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सगळा त्रास होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रात असलेल्या चुका. या चुका अशा आहेत ज्या दुरुस्त केल्या जाऊ शकत नाहीत. एकदा दिलेले विवाह प्रमाणपत्र फक्त जिल्हा न्यायालयच रद्द करू शकते. त्यामुळे आता या 15 जोडप्यांना आपण विवाहित आहोत हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. बंगालमधील विवाह निबंधक कार्यालयात एकूण 8000 विवाह प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. हे सर्व प्रमाणपत्रे कोरोनाच्या काळात जारी करण्यात आली होती. पण त्यापैकी 15 प्रमाणपत्रे अशी आहेत की ज्यामध्ये आता कोणतीही सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे या जोडप्यांसमोर एकच पर्याय उरतो तो म्हणजे आधी जिल्हा न्यायालयात जाऊन आपले लग्न रद्द करून मग नव्याने लग्न करण्याचा.


नेमक्या काय चुका आहेत?


या 15 जोडप्यांना नवीन विवाह प्रमाणपत्र घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यापैकी बारा हिंदू जोडपी आहेत. ज्यांनी विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत विवाह केला आणि 30 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे प्रमाणपत्र मिळवली होती. मात्र या या प्रमाणपत्रांमध्ये सुधारणा करता येणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. "या 15 विवाह प्रमाणपत्रांवरही कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. काहींमध्ये साक्षीदारांची नावे अ, ब, क अशा प्रकारे देण्यात आली आहेत. याशिवाय काहींमध्ये साक्षीदारांचे पत्तेही नोंदवले गेले नाहीत. हा डेटा अपलोड करणाऱ्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.


विवाह निबंधक कार्यालयाने केलेल्या तपासणीत लॉकडाऊन दरम्यान लग्नाच्या वेळी शहरातील किमान 15 जोडप्यांना विवाह निबंधकांनी केलेल्या कामाचा फटका बसला आहे. रजिस्ट्रारवरही यावरही याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कोविड लॉकडाऊनमुळे या रजिस्ट्रारने जोडप्यांना पडताळणीशिवाय कायदेशीर औपचारिकता पूर्ण करेल असे आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच ही चूक झाली आहे.