EPFO Interest Rates Hike: पीएफ खात (PF Account) असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पीएफ खात्यावर व्याज दर वाढवण्यासंदर्भात (PF Account Interest Rate) सरकारकडून मोठ वक्तव्य करण्यात आलं आहे. श्रम आणि रोजगार राज्य मंत्री रामेश्वर तेली (Labour & Employment Minister) यांनी राज्यसभेत वित्तीय वर्ष 2021-2022 च्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)  रकमेवर मिळणाऱ्या व्याज दरात कोणत्याही प्रकारचा बदल न करण्याच स्पष्ट केलं आहे. राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना श्रम आणि रोजगार राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी ही माहिती दिली आहे.


काय म्हणाले मंत्री?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी रकमेवरील व्याजदरात वाढ करण्याचा सरकार पुनर्विचार करत आहे का?' हा लिखित प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. व्याज दराच्या पुनर्विचारासंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव नसल्याचं, मंत्री रामेश्वर तेली यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच, पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ होणार नाही हे सिद्ध झालं. 


छोट्या बचत योजनांवर जास्त व्याज...


ईपीएफचं (EPF) व्याजदर हे सरकारच्या इतर योजनांच्या तुलनेत मिळणारे व्याजदर हे जास्त आहे. जसे की, सामान्य भविष्य निधि (7.10%), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (7.40%) आणि सुकन्या समृद्धी अकउंट योजना (7.60%) . मंत्री रामेश्वर तेली (Rameswar Teli) यांच्या मते, छोट्या बचत योजनांच्या पीएफद्वारे मिळणारे व्याजदर आजही जास्त आहे. म्हणून, व्याजदरात आणखी वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाहीये. ईपीएफवर मिळणारे व्याजदर 8.10 टक्क्यांनी देण्यासाठी मंजूरी मिळालेली आहे.