दरवाजा बंद होण्यापूर्वीच लिफ्ट सुरु, आणि पुढे जे घडलं ते भयानक
छत्तीसगडमध्ये एक वृद्ध महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
छत्तीसगड : लिफ्टचा वापरताना जरा सावधान ! कारण छत्तीसगडमध्ये एक वृद्ध महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. घटनेतील दृश्य विचलित करणारे आहेत.
नेमकं काय घडलं?
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात एक वृद्ध महिला मुलासोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये चढली. आधी मुलगा, पत्नी आणि मुलासोबत लिफ्टमध्ये शिरतो आणि नंतर ही वृद्ध महिला चढते. मात्र वृद्ध महिला लिफ्टचा दरवाजा बंद करण्यापूर्वीच लिफ्ट सुरु होते. काही समजण्याच्या आधीच लिफ्ट सुरु झाल्याने वृद्ध महिलेचे दोन्ही पाय लिफ्ट आणि दरवाजाच्या फटीमध्ये अडकतात. जवळपास पाचव्या माळ्यापर्यंत लिफ्टच्या गेटमध्ये पाय अडकून राहिल्याने महिलेचे दोन्ही पाय तुटले आहेत. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मुलाकडून वृद्ध महिलेला वाचवण्याचा प्रयत्न -
वृद्ध महिलेचा मुलगा सौरभने दोन्ही पाय काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अडकल्यामुळे पाय बाहेर निघत नव्हते. नादुरुस्त लिफ्टमुळे संपूर्ण घटना घडल्याचा आरोप सौरभने लावला आहे. कधीच लिफ्टची काळजी न घेतल्यामुळे लिफ्ट अचानक सुरु झाली.
पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लवने दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी यासंदर्भात वृद्ध महिलेची चौकशी केली असून तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.