नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख वाढवला आहे. सर्व विरोधक मोदींवर तुटून पडले असताना बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी मात्र त्यांचे जुने सवंगडी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचा नितीश यांच्यावर विश्वास नाही, असे लालूंनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीश कुमार यांच्यावर टीका करताना लालूंनी म्हटले आहे की, मोठ्या आपेक्षेने भाजपसोबत गेलेल्या जदयू आणि एआयडीएमके यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. त्यामुळे भाजपचा नितीश यांच्यावर किती भरवसा आहे, हे कळते. भाजपकडून नितीश यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी केवळ निमंत्रणसुद्धा दिले नाही, याकडे लक्ष वेधत भाजप जदयूचे संबंध कसे आहेत, हे स्पष्ट होते असे लालूंनी म्हटले आहे.


नितीश कुमार यांच्यावर हल्ला चढवताना लालूंनी ट्विटरचा आधार घेतला आहे. ट्विट करतना लालूंनी आपल्या तिरकस शैलीचा वापर केल आहे. तसेच, खास भोजपूरी ढंगात म्हणी वापरत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.