Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवीन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express ) गाड्या सुरू करण्याचा धडाका लावला आहे. देशभरात सध्या एकूण 18 वंदे भारत सुरू आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने मुंबई ते सोलापूर वंदे भारतला सर्वाधिक प्रवासी असल्याचा दावा केला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपर्यंत (Lok Sabha Elections) वंदे भारत बनविणाऱ्या कंपनीला टार्गेट दिल्याने घाई गडबडीत या रेल्वे बलविल्या गेल्याची बाब समोर आली आहे. याचदरम्यान वंद भारतचा पहिल्या पावसाचा व्हिडीओ समोर आला असून या एक्स्प्रेसमध्ये पावसामुळे गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिलमध्ये सुरू झालेल्या तिरुअनंतपुरम-कासारगोड (Thiruvananthapuram-Kasargod) या नवीन वंदे भारतमध्ये एक्झिक्युटीव्ह कोचला पावसामुळे गळती लागली होती. एसी व्हेंटमधूनच गळती झाल्याचा व्हिडीओ समोर आला. एसी व्हेंटच्या खाली बोगीमध्ये आतील अॅटोमॅटीक दरवाजावर पाणी पडत होते. हे पाणी एवढे होते की रेल्वे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती. 


वाचा : 'या' शहरांमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या 1 लीटरची किंमत


 रेल्वे कर्मचार्‍यांनी खाद्यपदार्थांचे ट्रे टाकून कोचमधील पाणी थांबविण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील त्याला ते पाणी बोगीभर होण्यापासून थांबविता येत नव्हते. वंदे भारत एक्स्प्रेसचा गेल्या काही वर्षांत अनेक अपघात झाले आहेत. एकदा तर जणावरे आदळल्याने अनेकदा पुढील बंपरच तुटून वेगळा झालेला आहे. यामुळे देखील वंदे भारत अनेकदा लोकांच्या निशाण्यावर आलेली आहे. 



 दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसमधील गळतीची ही घटना कधीची आहे? कोणत्या राज्यातील ट्रेनमधील आहे याचा खुलासा झालेला नाही. मात्र केरळ कॉंग्रेसने या गळतीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 


सुविधा काय आहेत


  • या ट्रेनमधील प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाइल चार्जिंग सुविधा

  • दुपारच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल

  • लोणावळा घाटातील विविध दृश्ये पाहण्यासाठी एक फिरती खुर्ची आहे.

  • मोबाईल किंवा कॅमेऱ्यावर विहंगम दृश्याचा आनंद घ्या

  • विमान प्रवासासाठी सज्ज होण्याची अत्याधुनिक सुविधा

  • मुंबई ते सोलापूरला फक्त ट्रेन साडेसहा तासात पोहोचते

  • या ट्रेनमध्ये दोन्ही चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कार प्रकारच्या बोगी