Petrol Price Today : 'या' शहरांमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या 1 लीटरची किंमत

Petrol Diesel Price on 15 June 2023 : गाडीमध्ये पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 15, 2023, 08:58 AM IST
Petrol Price Today : 'या' शहरांमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या 1 लीटरची किंमत title=
petrol diesel price on 15 June 2023

Petrol Diesel Price in Maharashtra : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या (Maharashtra Petrol Rate) किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, संकेत, इंधनाची मागणी, इतर.. दरम्यान महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर पेट्रोल पंपावर जाणार असाल तर त्याआधी एक लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घ्या... 

आज (15 जून 2023) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली आहे. येथे WTI कच्चे तेल प्रति बॅरल $ 68.25 वर आहे. त्याच वेळी, कमोडिटी मार्केटमध्ये ब्रेंट क्रूड ऑइल 0.64 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 73.06 वर आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोल आज 106.82 रुपये तर डिझेल 93.45 रुपये दराने विकले जाणार आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर खालीलप्रमाणे...

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

- मुंबईत पेट्रोल 106.49 रुपये आणि डिझेल 94.44 रुपये प्रति लिटर
- अहमदनगर पेट्रोल 106.62 आणि डिझेल 93.13 रुपये प्रतिलिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये तर डिझेल 92.79 रुपये प्रतिलिटर
- अमरावती पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42  रुपये प्रतिलिटर
- औरंगाबाद पेट्रोल 107.02 आणि डिझेल 93.51 रुपये प्रति लिटर
- जळगावात पेट्रोल 106.15 रुपये तर डिझेल 92.68 रुपये प्रतिलिटर 
- कोल्हापुरात पेट्रोल 106.58  रुपये आणि डिझेल 93.11 रुपये प्रतिलिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.40 रुपये आणि डिझेल 93.89 रुपये प्रतिलिटर 
- नागपुरात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रतिलिटर 
- नांदेडमध्ये पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 94.88 रुपये प्रतिलिटर 
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.68 रुपये आणि डिझेल 93.18 रुपये प्रतिलिटर 
- परभणी पेट्रोल 109.47 रुपये तर डिझेल 95.86 रुपये प्रतिलिटर
- पुण्यात पेट्रोल 106.31 आणि डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर
- रायगड पेट्रोल 105.89  आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
- सोलापुरात पेट्रोलचा 106.38 रुपये तर डिझेलचा दर 92.89 रुपये प्रतिलिटर 
- ठाण्यात पेट्रोल 106.49  रुपये आणि डिझेल 94.45  रुपये प्रतिलिटर  

अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या दररोज SMS द्वारे किंमत तपासण्याची सुविधा दिली आहे. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास, तुम्हाला RSP<डीलर कोड> 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. दुसरीकडे, नवीन किंमत तपासण्यासाठी बीपीसीएलच्या ग्राहकांना 9223112222 या क्रमांकावर <डीलर कोड> पाठवावा लागेल. तर HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस पाठवतात.