पानीपत : गावात सापडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या टीमवरच बिबट्याने हल्ला केला. चवताळलेल्या बिबट्याने कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मात्र तरीही कर्मचारी आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. त्यांनी बिबट्याला आपला जीव धोक्यात घालून रेस्क्यू केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ऑपरेशनमध्ये एक पोलीस आणि वन वन विभागाचे अधिकारी जखमी झाले आहेत. अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. वन विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना बिबट्याने रक्तबंबाळ केलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


वन विभाग अधिकाऱ्यांच्या या धाडसाला खरंच सॅल्युट करायला हवा. पानीपतमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना बिबट्यासह इथे सगळे सुरक्षित आहेत असं म्हटलं आहे. 


या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी हा सर्वात कठीण दिवस होता. त्यांच्या धाडसाला खूप सलाम असंही या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.