मागील आठवडा शेअर बाजारासाठी (Stock Market) चढ-उतारांनी भरलेला होता. काहीवेळातच बाजार  कोसळला, तर दुसऱ्याच दिवशी व्यवसाय तेजी पाहायला मिळाली. आठवडाभर चाललेल्या या गोंधळानंतरही मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 728 अंकांनी वधारला. दरम्यान, सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात वाढ झाली असून त्यापैकी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीला सर्वाधिक फायदा झाला आहे. LIC गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत सुमारे 45,000 कोटी रुपये कमावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चढ-उतार असतानाही गेल्या आठवडा शेअर बाजारासाठी चांगला आठवडा ठरला आहे. सेंसेक्सच्या टॉप 10 सर्वात मौल्यवान सेन्सेक्स कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे मार्केट कॅप एकत्रित 1,85,186.51 कोटी रुपये इतके आहे.  या कालावधीत ज्या सहा कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांवर प्रचंड नफा कमावला आहे. त्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC पहिल्या स्थानावर आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, पाच दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये एलआयसीचे मार्केट कॅप 7,46,602.73 कोटी रुपये झाले. यानुसार ज्यांनी एलआयसी शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यांना 44,907.49 कोटी रुपये मिळाले आहेत. एलआयसीचे शेअर्स गेल्या शुक्रवारी 2.51 टक्क्यांनी वाढून 1190 रुपयांवर बंद झाले होते.


या कंपन्यांची भरघोस कमाई


LIC व्यतिरिक्त, ज्या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी नफा कमावला आहे. त्यामध्ये टेक दिग्गज इन्फोसिस दुसऱ्या स्थानावर आहे. इन्फोसिस मार्केट कॅप 35,665.92 कोटी रुपयांनी वाढून 7,80,062.35 कोटी रुपयांवर पोहोचला. यासह ITC ने रु. 35,363.32 कोटी जोडले आणि ITC MCap रु. 6,28,042.62 कोटी वाढले. टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार मूल्य (TCS मार्केट व्हॅल्यू) 30,826.1 कोटी रुपयांनी वाढले आणि 15,87,598.71 कोटी रुपये झाले...


HDFC मध्ये गुंतवणुकीचे फायदे 


दूरसंचार कंपनी भारती एअरटेल देखील गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदारांच्या कमाईच्या बाबतीत पुढे राहिली. एअरटेलचे बाजारमूल्य 30,282.99 कोटी रुपयांनी वाढले असून बाजार भांडवल 8,62,211.38 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. याशिवाय खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 8,140.69 कोटी रुपयांनी वाढून 12,30,842.03 कोटी रुपये झाले आहे.