Ram Navami 2024 LIVE : रामलल्लावर सूर्यतिलक अद्भूत सोहळा

Wed, 17 Apr 2024-12:40 pm,

Ayodhya Ram Mandir : रामनवमीनिमित्त अयोध्येत तब्बल 500 वर्षांनंतर राम जन्म सोहळा होतोय. रामनवमीनिमित्त आज रामलल्ला भाळी सूर्यतिलकाची मोहोर करण्यात येणार आहे. अयोध्येतील प्रत्येक अपडेट आणि अद्भूत सोहळ्याचा LIVE यासाठी इथे क्लिक करा.

Ram Lalla Surya Tilak Today Live Update : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला दुपारी श्रीरामाचा जन्म झाला. या दिवसाचा सोहळा रामनवमी अख्या जगभरात करण्यात येतो. तबब्ल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यातील मंदिरात विराजमान झाले आहे. त्यामुळे रामनवमीनिमित्त अयोध्या राममय झाली आहे. 


 

Latest Updates

  • Ram Lalla Surya Tilak Today Live Update : प्रभू श्रीरामाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर

    तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत प्रथमच रामनवमीचा सोहळ्या पार पडतोय. राम जन्मदिनानिमत्त श्रीरामाच्या कपाळी सूर्यतिलकाची मोहोर करण्यात आली. यानंतर हा सोहळा दरवर्षी रामनवमीला असणार आहे. 

  • Ram Lalla Surya Tilak Today Live Update : रामलल्लावर सूर्यतिलक अद्भूत सोहळा

    अद्बूत, अद्वितीय, असा रामलल्ला सूर्यतिलक सोहळा पाहून प्रत्येक जण धन्य होत आहे. 

  • Ram Lalla Surya Tilak Today Live Update : अयोध्येतील राम मंदिरातील थेट प्रेक्षपण

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra या अकाऊंटवर अयोध्यातील राम मंदिरातील सोहळ्याचं थेट प्रेक्षपण तुम्हाला पाहिला मिळणार आहे. 

  • Ram Lalla Surya Tilak Today Live Update : रामनवमीला रामलल्ला पिवळा आणि गुलाबी रंगाचा पोशाख

    आतापासून काही काळानंतर प्रभू रामलल्ला यांच्या जन्मदिनाचा सोहळा सूर्य टिळकांनी सुरुवात होणार आहे. सकाळपासून रामलल्लाच्या पूजेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या विशेष दिवशी, रामलल्ला सोन्याचे दागिने आणि रत्नांनी जडलेला पोशाख परिधान करण्यात आलाय. 

  • Ram Lalla Surya Tilak Today Live Update : रामनवमीनिमित्त रामलल्लाला सूर्यभिषेक कसा करणार?

    मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.16 मिनिटांनी तीन आरशांच्या माध्यमातून सूर्याची किरणे वेगवेगळ्या कोनातून वळवली जाईल. त्यानंतर ते ब्रास पाईप्सद्वारे सूर्याची किरण रामलल्लाच्या कपाळी पडणार आहे. या अद्भूत क्षणाचा प्रयोग करण्यात आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

  • Ram Lalla Surya Tilak Today Live Update : मनी ध्यानी रामाचा जप, अयोध्या नगरीत भक्तांची मांदियाळी

    500 वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने अयोध्या नगरी भक्तांना फुलून गेली आहे. मनी ध्यानी रामाचा जप करत अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान  गडी आणि राम मंदिर परीसर भक्तांची मांदियाळी पाहिला मिळत आहे. 

     

  • Ram Navami 2024 LIVE : अयोध्या मंदिर आज 19 तासांसाठी राहणार सुरु 

    रामनवमीनिमित्त सुमारे 30 लाख भक्त अयोध्येत भगवान श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची शक्यता सरकाराने व्यक्त केली आहे. यासाठी पहाटे साडेतीन वाजल्यापासून भाविक रांगेत उभे असल्याच पाहिला मिळत आहेत. अयोध्येत आज सर्वत्र आनंदाचे वातावरण असून रामलल्लाच्या सूर्य टिळकाच्या दर्शनासाठी भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. मंदिर प्रशासनाने रामलल्लाच्या दर्शनाची वेळ 19 तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मंगळ आरतीपासून रात्री 11 वाजेपर्यंत भक्त रामलल्लाचे दर्शन घेऊ शकणार आहे. या कालावधीत मंदिराचे दरवाजे फक्त 4 वेळा फक्त 5-5 मिनिटांसाठी बंद करण्यात येणार आहे. 

     

  • Ram Navami 2024 LIVE :  रामलल्लाचा दिव्य अभिषेक सोहळा 

    आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर रामजन्मभूमी अयोध्या मंदिरात भगवान रामलल्लाचा दिव्य अभिषेक करण्यात आला. 

  • Ram Navami 2024 LIVE :  प्रभू श्रीरामाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर

    रामलल्लावर सूर्य टिळक करण्यात येणार आहे. आतापासून काही तासांनंतर, तो अनोखा क्षण येईल जेव्हा सूर्यदेव आपल्या किरणांनी प्रभू रामाच्या कपाळावर अभिषेक करणार आहे. दुपारी 12.16 वाजता सूर्याची पहिली किरण प्रभू रामाच्या कपाळावर पडेल आणि त्यानंतर सूर्यदेव सुमारे 4 मिनिटं रामल्ललाचे सूर्यतिलक होणार आहे. 

  • Ram Navami 2024 LIVE : रामनवमीनिमत्त अयोध्या झाली राममय! 

    अयोध्येत पहिल्या रामनवमीचा उत्साह दिसून येतोय. अयोध्येत भक्तांनी तुफान गर्दी केली आहे. रामनवमीच्या भव्य सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो दाखल झाले आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link