Live Blog: लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चे विश्लेषण

Sun, 02 Jun 2024-8:48 pm,

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? झी न्यूजची AI अ‍ॅंकर Zeenia चे विश्लेषण

Exit Poll Results Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे.


( DISCLAIMER- 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, ZEE २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)

Latest Updates

  • महाराष्ट्रातही एनडीएला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  एनडीएची टॅली 41 वरुन 26 ते 34 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीची टॅली 5 वरुन 15 ते 21 वर जाण्याची शक्यता आहे. 

  • दिल्लीतही इंडिया आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळतील असा अदांज आहे.  गेल्यावेळी इंडिया आघाडीला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपच्या जागा 7 वरुन 2 ते 4 दरम्यान घटण्याची शक्यता आहे. 

  • राजस्थानमध्येही एनडीएला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीच्या जागा 26 वरुन 15 ते 16 च्या दरम्यान घसरण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीच्या जागा ० वरुन 6 ते 10 जागांवर जाण्याची शक्यता आहे. 

  • मध्य प्रदेशात एनडीच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएची टॅली 28 वरुन 16 ते 22 वर घसरण्याची शक्यता आहे. तर इंडियाची टॅली १ वरुन ८ ते १२ च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. 

  • पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढण्याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  इंडिया आघाडील 3 ते 5, एनडीएला 5 ते 7 तर इतरांना 2 ते 4 जागांचा अंदाज वर्तवला जात आहे.  गेल्यावेळी काँग्रेसला 8 तर एनडीएला 4 जागा मिळाल्या होत्या.

  • उत्तर प्रदेशात एनडीएला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एनडीएच्या जवळपास 8 ते 12 जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  2019 मध्ये एनडीएला 64 जागा मिळाल्या होत्या.  एक्झीट पोलमध्ये 52 ते 58 जगांचा अंदाज वर्तवला जात आहे. 

  • एनडीएच्या जागा घटणार मात्र मोदी सरकारच येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, या राज्यात एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

  • Zee News AI Exit Poll 2024 : 'एक्झिट पोल नक्की किती खरं आहे यावर मला शंका आहे. कारण भारतातील मतदाता आपण कोणाला मत दिलं याबद्दल किती खरं बोलतात हे कसं ठरवणार.' असा प्रश्न राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी उपस्थितीत केलाय. 

  • Zee News AI Exit Poll 2024 : 'शनिवारी आलेल्या एक्झिट पोलवर जर विश्वास ठेवला तर दक्षिणेकडील बदल होणार हे दिसून येत आहे. त्याशिवाय या बदलमागील कारणं पाहावे लागणार आहेत.', असं मत राजकीय अभ्यासक प्रकाश पवार यांनी झीच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केलंय.  

  • Republic Bharat-MATRIZE Exit Poll: दिल्लीत कोणाची सत्ता?

    रिपब्लिक भारत-मॅटराइजच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत NDA ला 5 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.तर इंडिया आघाडीला 0-2 जागा मिळू शकतील.

  • India News-D-Dynamics Exit Poll : NDA तिसऱ्यांदा सत्तेत येणार?

    Zee News AI Exit Poll 2024 : इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीला 371 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला 125 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. इतर पक्षांना 47 जागा मिळतील.

     

  • ABP-CVoter Exit Poll: महाराष्ट्रात काय होणार?

    एबीपी-सीवोटर एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर असणार आहे. महाराष्ट्रात 48 जागांपैकी महायुतीला 22-26 तर महाविकास आघाडीला 23-25 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

  • Lok Sabha Elections 2024: शनिवारी विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, NDA तिसऱ्यांदा सत्तेवर येणाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीचं सत्तेचं स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. 

  • Lok Sabha Elections 2024: 4 जून रोजी सर्वत्रिक लोकसभा निवडणुकांची मतमोजणी असून मंगळवारी लोकसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी लोकसभेत कोणाला किती जागा मिळणार याचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. झी न्यूजच्या अँकर झीनिया पहिल्यांदा  AI एक्झिट पोल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर ठरणार आहे. झिनीयाने  AI एक्झिट पोलचे  analyze कसं केलं हे आपण जाणून घेऊया. 

    बातमीची लिंक- Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोल

  • लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. शनिवारी अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अँकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर ठरणार आहे. झिनीयाला या काळात कसा अनुभव आला? हे जाणून घेऊया. 

    बातमीची लिंक- लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सांगणारी एकमेव AI अ‍ॅंकर Zeenia चा कसा होता अनुभव?

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link