Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Wed, 05 Jun 2024-8:12 am,

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Latest Updates

  • दिल्लीत खलबतं

    लोकसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीत मोठ्या हालचालींना वेग आलाय. एनडीएकडे बहुमत असलं तरी देखील इंडिया आघाडीचा सरकार स्थापनेचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक होईल. तर दुसरीकडे एनडीएची देखील उद्या दिल्लीत बैठक होऊ शकते. चंदबाबू नायडू उद्या दुपारी 2 वाजता दिल्लीत पोहोचतील तर नितीश कुमार देखील सकाळी 11 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत.

  • लोकसभा निवडणूक निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

    जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या आपुलकीसाठी मी जनता जनार्दन यांना प्रणाम करतो आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकभरात केलेले चांगले काम आम्ही सुरूच ठेवू अशी ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: ही लढाई संविधानाच्या रक्षणासाठीच होती- राहुल गांधी 

    लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर काँग्रेस नेते आणि विजयी उमेदवार राहुल गांधी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. 'मी आधीच ठरवलं होतं, त्यांनी जेव्हा आमची खाती गोठवली, पक्ष फोडले तेव्हाच मी ठरवलं होतं की, भारतातील जनतेनं संविधानासाठी एकत्र येऊन लढावं आणि मला विश्वासही होता. मी जनतेचा, इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचा, नेता आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल उचललं आहे. आम्ही आघाडीतील उमेदवारांचा आदर केला आणि जिथं लढलो, तिथं एकजुटीनं लढलो. काँग्रेसनं इंडिया आघाडीनं अतिशय स्पष्टपणे देशाला एक नवा दृष्टीकोन दिला आहे. आरक्षणांवर भाजपचं आक्रमण, गरीबीच्या आलेखात वाढ... अदानींचे शेअर तुम्ही पाहिले? जनता मोदींचा थेट संबंध अदानींशी समजत आहे.. जनतेनंच मोदींना नाकारलं आहे. आम्ही ते ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत त्याचं समर्थन करत नाही हेच जनतेनं पंतप्रधानांना दाखवून दिलं आहे आणि मला या जनतेचा प्रचंड अभिमान वाटतोय', अशी प्रक्रिया देत समाजातील प्रत्येक वर्गाच्या पाठीवर त्यांनी शाबासकीची थाप देत संविधानचं रक्षण करण्यासाठी पुढे आलेल्या प्रत्येकाचे आभार मानत, आम्ही आमची सर्व आश्वासनं पूर्ण करू याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: लोकसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसची पत्रकार परिषद... कोण काय म्हणालं? 

    बँक खाती गोठवण्यापासून नेत्यांच्या वाटेत अडथळे आणण्यात आले. पण, सुरुवातीपासूनत काँग्रेसचा प्रचार सकारात्मक वळणावर सुरु झाला. बेरोजगारी, महागाई या आणि अशा मुद्द्यांसह आम्ही जनतेसमोर आलो आणि जनतेनं आम्हाला साथ दिली, असं मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांना समर्थन देत या यात्रांनी विजयी सरशीमध्ये मोठी भूमिका बजावल्याचं ते म्हणाले. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी पक्ष मुख्यालयात पोहोचताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 

    राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेस पक्ष मुख्यालयात पोहोचताच तिथं कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याच क्षणाची ही दृश्य... 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  हिमाचल प्रदेशातून अनुराग ठाकूर विजयी 

    हिमाचल प्रदेशातील हमीरपपूर मतदारसंघातून अनुराग ठाकूर विजयी झाले असून, काँग्रेसच्या सतपाल रायजादा यांना त्यांनी 182357 मतांनी पराभूत केलं. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  ही जनतेची लढाई होती आणि... , नाना पटोले यांची सूचक प्रतिक्रिया 

    देशभरात इंडिया आघाडीला मिळालेली सरशी पाहता ही जनतेची लढाई होती आणि जनतेनं संघर्ष करत राहुल गांधी यांना पाठिंबा दिला. देशात आता परिवर्तन सुरु झालं असून, जनतेनं हुकूमशाहीला उत्तर दिलं आहे. हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पराभव असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. 

    हेसुद्धा वाचा : Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; वाचा एकाच क्लिकवर

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  राहुल गांधी दोन्ही मतदारसंघांतून विजयी 

    काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली अशा दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले असून, उत्तर प्रदेशातील गड त्यांनी खऱ्या अर्थानं राखला. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी 

    लोकशाही निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली त्यावेळी पिछाडीवर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 152513 इतक्या मताधिक्यासह त्यांनी काँग्रेसचे अजय राय यांना पराभूत केलं. 

     

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: मल्लिकार्जुन खरगे यांचं अभिनंदन - दिग्विजय सिंह 

    मध्य प्रदेशच्या राजगढ येथील काँग्रेस नेते आणि लोकसभेच्या जागेसाठीचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं अभिनंदन केलं आहे. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कर्नाटकमध्ये भाजपचा विजय 

    कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे भाजपनं विजय मिळवला आहे. गोविंद मकथप्पा करजोल यांनी या लढतीमध्ये 48,121 मतांनी बीएन चंद्रप्पा यांना मागे टाकलं.

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: इंडिया आघाडीच्या बैठकीवर सर्वांच्याच नजरा 

    एकिकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येण्यास सुरुवात केलेली असतानाच दुसरीकडे आता राजकीय समीकरणांना अधिक वाव मिळताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आणि काही नेतेमंडळींच्या माहितीनुसार बुधवारी दिल्लीमध्ये सत्ताधारी एनडीएतील घटक पक्षांनी बैठक बोलवली आहे. तर, तिथं काँग्रेसनंही मोर्चेूबांधणी सुरू केली आहे. सर्व मित्रपक्षांसोबत काँग्रेसनं संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, बुधवारी इंजिया आघाडाचीही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: जालंधरमधून काँग्रेसचा विजय 

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता चरणजीत सिंह चन्नी यांनी जालंधरमधील जागेवर विजय मिळवला असून, त्यांनी 1,75,993 मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: नितीश कुमार NDA सोबतच? 

    सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार परतले असून, आमचा पक्ष पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असल्याची माहिती जेडीयू नेता केसी त्यागी यांनी दिली आहे. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कंगना राणौत विजयी 

    हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौत विजयी झाली असून, हा विजय सनातनचा आहे, असं म्हणत तिनं आभार मानले. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: इंडिया आघाडीत घडामोडींना वेग....

    इंडिया आघाडीला मिळालेले कल आणि त्यानंतर हाती येणारं यश पाहता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची ये-जा सुरू झाली आहे. एएनाय य़ा वृत्तसंस्थेनं काँग्रेस नेते जयराम रमेश खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले तो क्षण टीपला.... 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  इंडिया आघाडीला मिळालेल्या पाठिंब्यानंतर शरद पवार म्हणाले... 

    'उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळा निकाल दिला. यापूर्वी उत्तर प्रदेश आणि या भागात जे यश मिळायचं ते फार मोठं असायचं आता मिळालेला विजय कमी मताधिक्याने मिळाला आहे. याचा अर्थ आम्ही राष्ट्रीय पातळीवर जे काम करतो त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद आहे', असं शरद पवार म्हणाले. 

    हा निकाल परिवर्तनास पोषक असून, सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात वेगळा निकाल लागला. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची जबाबदारी घेतल्या कारणानं हे यश इंडिया आघाडीच्या वाट्याला आलं. येत्या काळात आमची धोरणं ठरवून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू असं सांगत इंडिया आघाडीची बैठक पार पडणार असल्याचं शरद पवार म्हणाले. दरम्यान आपला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा झाली नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: इंडिया आघाडीच्या वतीनं शरद पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी 

    नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली असून, शरद पवारांचा नितीश कुमारांना फोन गेल्याचं म्हटलं जात आहे. सत्ता स्थापनेसाठीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतून नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीत आणण्याची जबाबदारी पवारांवर सोपवण्यात आली असून, नितीश कुमार यांना उप पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात 
    आल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  #ZEENIA नं वर्तवला Exact अंदाज; 400 पार चा फुगा फुटला

    झी मीडियाच्या वतीनं AI Exit Poll च्या माध्यमातून #ZEENIA नं वर्तवलेल्या अंदाजांनुसार देशात इंडिया आघाडीलासुद्धा चांगलं यश मिळताना दिसत आहे. विरोधकांनी भाजपला टोला लगावत 400 पार चा फुगा फुटला असं म्हणत हिणवलं. राजद नेता मनोज झा यांनी यावेळी, 'भाजप एकूण 220-230 जागांवर पोहोचल असून, बहुमतापासून पक्ष अजूनही दूर आहे. चंद्राबाबू आणि जेडीयुची मतं न जोडल्यास भजपला बहुमताचा आकडा ओलांडता येणार नाही' असं म्हटलं. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देश पातळीवर राजकीय घडामोडींना वेग... 

    देश पातळीवर लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले असता आता एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये असणारा आघाडीचा फरक कमी होताना दिसत असून, मोठ्या पक्षांकडून लहान पक्षांची मनधरणी करण्याची सूत्र वेगानं सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. इथं नितीश कुमार आणि काँग्रेस यांच्याच चर्चा सुरु असतानाच तिथं नितीश कुमार मात्र भाजपसोबतच जाणार का? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: महबुबा मुफ्ती यांच्या वाट्याला अपयशाची चिन्हं 

    पीडीपी प्रमुख आणि अनंतनाग- राजौरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महबुबा मुफ्ती पिछाडीवर आघाडीवर असून, या जागेवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मियां अल्ताफ अहमद 1,84,726 मतांच्या फरकानं आघाडीवर आहेत. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: रायबरेली, वायनाडमध्ये काँग्रेसचं नाणं खणखणीत 

    केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी 2,22,424 मतांनी आघाडीवर असून, उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्येही त्यांच्याकडे  1,64,249 मतांची आघाडी आहे. तेव्हा आता रायबरेली आणि वायनाडमध्ये काँग्रेसचं नाणं खणखणीत असल्याचं स्पष्ट होत आहे. 

  • Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देश पातळीवरील आकडेवारी काय सांगते?

    NDA : 290
    भाजप - 244
    टीडीपी - 16
    जदयू - 15
    शिवसेना - शिंदे - 6
    राष्ट्रवादी - अजित पवार - 1

    I.N.D.I.A - 233
    काँग्रेस - 93
    समाजवादी पार्टी - 32
    तृणमूल काँग्रेस - 31
    डीएमके - 21
    शिवसेना - ठाकरे - 10
    राष्ट्रवादी - शरद पवार - 8 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: काश्मीरमध्ये कल कोणाच्या बाजूनं? 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: प्रज्वल रेवन्नाचा पराभव 

    लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या प्रज्वल रेवन्नाचा पराभव. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. हसन लोकसभा मतदारसंघात रेवन्ना पराभूत

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: उत्तर प्रदेशात सपाच्या कोणत्या उमेदवारांकडे आघाडी? 

    उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा जागेवरून अखिलेश यादव  64,511 मतांनी आघाडीवर असून, डिंपल यादव या मैनपुरी जागेवरून  79,734 मतांनी आघाडीवर आहेत. तिथं उत्तर प्रदेशातच वाराणासी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 79,566  मतांनी आघाडीवर आहेत. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अपेक्षेहून जास्त यश... इंडिया आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया 

    निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या नव्या आकडेवारीनुसार रोहतक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपेंद्र सिंह हुड्डा 1,17,616 मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणी अद्यापही सुरु असून सुरुवातीचे कल पाहता मिळालेलं यश अपेक्षित किंबहुना त्याहूनही जास्त आहे, असं म्हणत हुड्डा यांनी मतदारांचे आभार मानले. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अमित शाह मोठ्या फरकानं आघाडीवर... 

    गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेच्या जागेवर अमित शाह मोठ्या फरकानं आघाडीवर असून, हा फरक 6 लाख मतांचा असल्याचं सांगितलं जात आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  रायबरेलीमध्ये राहुल गांधी 116100 मतांनी आघाडीवर. आतापर्यंतची आकडेवारी... 

    कांग्रेस -218232
    भाजपा -102132
    बसपा -7178

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा जल्लोष सुरु 

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला जल्लोष सुरु झाला असून, इथं पक्षानं 30 जागांवर आघाडी घेतली आहे. ज्यामुळं पक्ष कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयाबाहेर जल्लोष सुरु केला आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  काँग्रेसची पक्षबांधणी सुरू, सत्तासमीकरण कसंय पाहा... 

    इंडिया आघाडीलासुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये समधानकारक आकडेवारी पाहायला मिळत असून, एकंदर जागांवरील आकडेवारी पाहता काँग्रेस पक्षाकडून टीडीपी आणि नितीश या दोघांशीही चर्चा करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  जन्मभूमीच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर- कंगना राणौत 

    हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या भाजप उमेदवार कंगना राणौतनं हिमाचल ही आपली जन्मभूमी असून, मी येथील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असेन असं म्हटलं. सर्वांची साथ, सर्वांचा विकास हे पंतप्रधानांचं स्वप्न असून आपली त्यांना कायम साथ असेल असंही कंगना म्हणाली. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पहिल्या 3 तासांनंतर देशात कल बदलले, महाराष्ट्रात 'भाकरी फिरली'

    अधिक वाचा : Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: कोल्हापूरमधून शाहू महाराज 25 हजार मतांनी आघाडीवर

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: ... तर सत्ता इंडिया आघाडीची 

    'काँग्रेसनं 100 जागांवर विजय मिळवल्यास देशात इंडिया आघाडीचं सरकार असेल. काँग्रेस पक्षाला 150 जागांवरही विजय मिळू शकते. जर देशात काँग्रेस मोठा पक्ष ठरला तर याच पक्षाचा पंतप्रधान असणार आहे. देशातील नागरिकांचीसुद्धा हीच इच्छा पाहायला मिळत आहे', अशा आशावादी सूर संजय राऊत यांनी आळवला. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: शेअर बाजार कोसळला 

     निवडणूक निकालांची आकडेवारी जाहीर होत असतानाच शेअर बाजारातून सर्वाच मोठी बातमी समोर आली. निकालांचे कल हाती आले त्या क्षणी सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळला असून, निफ्टी 900 अंकानीं कोसळला आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: INDIA च्या उत्तम कामगिरीचं श्रेय राहुल गांधी यांना - संजय राऊत 

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना निवजणुकीचे हाती आलेले पहिले कल पाहता त्याव आपली प्रतिक्रिया दिली. 'संपूर्ण देशामध्ये INDIA आघाडीला मिळणारं यश पाहता त्याचं श्रेय राहुल गांधी यांना दिलं पाहिजे. त्यांच्या नेतृतत्वाच्याच बळावर काँग्रेसनं 150 जागांपर्यंत आघाडी घेतील असून, हे मोठं यश आहे. INDIA आघाडी बहुमताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे', असं ते म्हणाले. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 543 जागांचे कल हाती, काय आहे नवी आकडेवारी ? 

    लोसकभा निवडणुकीतील 543 कलांपैकी 290 जागांवर एनडीएला आघाडी असून, 225 जागांवर इंडिया आघाडीला सरशी मिळाल्याचं दिसत आहे. इतर पक्षांना 28 जागांवर आघाडी मिळाली असून नुकतीच ही आकडेवारी समोर आली आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री आघाडीवर 

    मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान विदीषा मतदारसंघातून 1,88,350 मतांनी आघाडीवर. पुढील मतमोजणी अद्यापही सुरुच.

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किती मतांची आघाडी? 

    • वाराणासीतून पंतप्रधान मोदी 85,152 मतांनी आघाडीवर 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      गांधीनगर येथून भाजपचे अमित शाह 1,88,664 मतांनी आघाडीवर 

    • वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी 80,203 मतांनी आघाडीवर 

    • आलप्पुझातून काँग्रेसचे केसी वेणुगोपाल 14,435 मतांनी आघाडीवर 

    • बँगळुरू दक्षिण येथून भाजपचे तेजस्वी सूर्य 69,365 मतांनी आघाडीवर 

    • पाटलीपुत्र येथून राजदच्या मीसा भारती 7,993 मतांनी आघाडीवर  

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: असदुद्दीन ओवैसी आघाडीवर 

    एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादमधील असदुद्दीन ओवैसी 15461 जागांनी आघाडीवर. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आंध्र प्रदेशातून सर्वात पहिले कल हाती, इंडिया आघाडीची मुसंडी 

    आंध्र प्रदेशातून सर्वात पहिले कल हाती, इंडिया आघाडीची मुसंडी पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशात इंडिया आघाडी 20, टीडीपी 15 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. तर, वायएसआर काँग्रेसला मात्र धक्का. तामिळनाडूतही इंडिया आघाडीची 37 जागांवर सरशी. मध्य प्रदेशात काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी नाही. सर्व 29 जागांची आघाडी भाजपकडे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? 

    अयोध्येतून भाजपचे लल्लू सिंह पिछाडीवर 
    जोरहाट येथील काँग्रेसचे गौरव गोगोई आघाडीवर 
    रायबरेली आणि वायनाडमधून काँग्रेस नेता राहुल गांधी आघाडीवर  
    कन्नौजमधून सपाचे अखिलेश यादव आघाडीवर 
    अमेठातून काँग्रेसचे के.एल शर्मा आघाडीवर 
    कोयंबतूरमधून भाजपचे अन्नामलाई पिछाडीवर 
    सुल्तानपूरमधून मनेका गांधी 6000 मतांनी पिछाडीवर 
    फुलपूर येथून भाजपचे नवीन पटेल आघाडीवर 
    उत्तर मुंबईतून पीयुष गोयल आघाडीवर

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अमेठीमध्ये स्मृती इराणी पिछाडीवर 

    उत्तर प्रदेशात अमेठीतून भाजपच्या विद्यमान खासदार स्मृती इराणी पिछाडीवर असून, काँग्रेसचे के.एल. शर्मा 10500 मतांनी आघाडीवर आहेत. तर, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शाह 2.50 लाख मतांनी आघाडीवर, तर, वाराणासीतून पंतप्रधान मोदी आघाडीवर आहेत. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाबरोबरच राज्यातही NDA आणि INDIA मध्ये अटीतटीची लढाई

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 500 जागांचे कल हाती... 

    आतापर्यंत 500 जागांचे कल हाती आले असून, एनडीएला 297 जागांवर आघाडी मिळाली असून, इंडिया गटाकडे 218 जागांची आघाडी असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला आघाडीचा आलेख पाहायला मिळत असून, उत्तर प्रदेशातही सपा आघाडी घेताना दिसत आहे. तर, अयोध्या आणि अमेठीमध्येही इंडियाला आघाडी... 

     

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पंतप्रधान मोदी पिछाडीवर

    वाराणासी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर तर, काँग्रेसचे अजय राय आघाडीवर. वाराणासी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 हजार 30 मतांनी पिछाडीवर 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आघाडीचा आलेख बदलण्यास सुरुवात 

    आताच्या क्षणाची मोठी बातमी. आघाडीचा आलेख बदलण्यास सुरुवात. INDIA आघाडीकडे आता कल दिसून येत असून, एनडीएकडे 280 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. तर, इंडिया आघाडीनं 187 जागांवर सरशी मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अनुराग ठाकूर यांच्याकडे किती मतांची आघाडी? 

    केंद्रीय मंत्री आणि हमिरपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अनुराग ठाकूर यांनी 6492 मतांनी आघाडील घेतली असून, ही मोठी आघाडी समजली जात आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 'वारिस पंजाब दे'चे उमेदवार आघाडीवर 

    पंजाबच्या खदूर साहिब येथील लोकसभा उमेदवार 'वारिस पंजाब दे' गटाचे प्रमुख अमृतपाल सिंग यांनी 7333 मतांनी आघाडी घेतली आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आघाडीवर असणाऱ्या VIP उमेदवारांची यादी 

    • मंडी येथून भाजप उमेदवार कंगना राणौत आघाडीवर

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      हमीरपूर तेथून भाजप नेते अनुराग ठाकूर आघाडीवर 

    • गौतम बुद्ध नगर येथून भाजप उमेदवार महेश शर्मा आघाडीवर

    • पुरीतून भाजपचे संबित पात्रा आघाडीवर 

    • पटना साहिब येथून रविशंकर प्रसाद आघाडीवर 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अमित शाह आघाडीवर 

    केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे उमेदवार अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगर येथील लोकसभा मतदारसंघात 7311 मतांनी आघाडी घेतली आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशभरातील व्हीआयपी नेत्यांपैकी कोण आघाडीवर? 

    • गोरखपूर येथून भाजपचे रवि किशन आघाडीवर 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      करनाल येथून भाजप नेता आणि माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आघाडीवर 

    • गुना येथून भाजप उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया आघाडीवर 

    • रायबरेली येथून काँग्रेस नेते राहुल गांधी आघाडीवर 

    • हैदराबाद येथून AIMIM चे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर 

    • पुर्णिया येथून अपक्ष उमेदवार पप्पू यादव आघाडीवर

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 543 पैकी 493 जागांची आघाडी समोर 

    543 पैकी 493 जागांची आघाडी समोर आली असून, उत्तर प्रदेशात 40 जागांवर एनडीए आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, गुजरात 25 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात एनडीएकडे 29 जागांची आघाडी आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: एनडीएनं ओलांडला बहुमताचा आकडा 

    मतमोजणीच्या पहिल्या कलांनुसार सत्ताधारी एनडीएकडे बहुमत असून आतापर्यंत एनडीएकडे 304 जागांची आघाडी आहे. तर, INDIA च्या वाट्याला 138  जागांची आघाडी आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: मतमोजणीच्या दिवशी शशी थरुर माध्यमांसमोर येत म्हणाले... 

    काँग्रेस नेते आणि केरळातील तिरुवअनंतपूरम येथील खासदार शशी थरुर यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला... आम्ही एकतर जिंकू किंवा अपयशी ठरू... पण, माझ्या दृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास आमचा विजय होणार आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: उत्तर प्रदेशात 80 पैकी 80 जागांवर भाजपचाच विजय? 

    उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी मतमोजणीच्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना, भाजपकडे 80 पैकी 80 जागा येणार असून,  विरोधी पक्ष आधारहिन असून, जनतेनंही त्यांना नकार दिल्याचं ते म्हणाले. दरम्यान पहिल्या तासात समोर आलेल्या आकडेवारीनुसार एनडीएला 220 जागांवर आघाडी मिळाली असून, या कलांनुसार भाजपकडेच बहुमत असल्याचं स्पष्ट होत आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: दिल्लीमध्ये कोणाला आघाडी? 

    आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सर्व 7 जागांवर भाजपला आघाडी मिळाली असून, पंजाबमध्येसुद्धा भाजपला दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, काँग्रेसकडे तीन जागांची आघाडी आहेच. ताज्या आकडेवारीनुसार देशभरात NDA 165 आणि INDIA ला 78 जागांवर आघाडी मिळाली आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: महाराष्ट्रातील आघाडीचं नेमकं चित्र काय? कोणाला मिळतेय सरशी? 

    माढामधून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत. सिंधूदूर्ग-रत्नागिरीमधून नारायण राणे आघाडीवर असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं चित्र प्राथमिक कलांमध्ये दिसत आहे. कल्याणमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीमधून पाहिला कल हाती आला असून पोस्टल मतदानामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा पराभव अटळ 

    उत्तराखंड येथील हरिद्वार लोकसभा जागेवरील उमेदवार त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मतमोजणीच्या दिवशी भाजपच्या विजयासंबंधी मोठं वक्तव्य केलं. भाजपच्याच या नेत्यानं म्हटलं, '... हरिद्वार हा काँग्रेसला गड होता. पण, इथं ही पकडही ढिली पडली. इथं भाजपला दोनदा विजय मिळाला. यावेळीसुद्धा भाजप राज्यातील सर्व 5 जागांवर मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवेल असा विश्वास आहे.'

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: भाजपचे कोणते उमेदवार आघाडीवर? 

    देशातील पहिले कल हाती. भाजपकडे 94 जागांची आघाडी. इंडियाकडे 51 जागांची आघाडी. रामपुरमध्ये भाजप आघाडीवर सपा, पिछाडीवर. भाजपचे उमेदवार, राजनाथ सिंह आघाडीवर. दिल्लीमध्ये भाजपकडे 7 जागांची आघाडी. पश्चिम बंगालमध्येही भाजपकडे 11 जागांची आघाडी. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशात INDIA ला किती जागांवर आघाडी? 

    एकिकडे भाजपकडे पहिल्या कलांची आघाडी असतानाच दुसरीकडे देशात NDA 52 जागांवर, तर INDIA ची 20 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली दोन्ही जागांवरून आघाडीवर असल्याची माहिती नुकतीच हाती आली आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: हिमाचल प्रदेशातून कंगना राणौत पिछाडीवर... 

    देशभरातील लोकसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली असूनस हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणौत निवडणुकीच्या रिंगणात असून, मतमोजणीच्या पहिल्या तासात त्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं कनौज येथून अखिलेश यादव आघाडीवर. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पहिले कल हाती... 

    उत्तर प्रदेशात भाजप एका जागेवर आघाडीवर. टपाली मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिले कल हाती. टपाली अर्थात पोस्टल मतांमध्ये एनडीए 14 जागांवर आघाडीवर. पाहा कशी सुरुये मतमोजणी... 

    अधिक वाचा : Lok Sabha Election Results 2024 : निकालाआधीच उघडलं भाजपचं खातं; 'या' राज्यात बिनविरोध विजय 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आता तरी देवा मला पावशील का... 

    लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्याआधी या अतिशय महत्त्वाच्या दिवशी देशभरातील राजकीय नेतेमंडळींनी आपआपल्या आराध्य दैवतांपुढे नतमस्तक होत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: एनडीला निकालाआधीच एका जागेवर मिळाला बिनविरोध विजय 

    लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच किंबहुना मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच गुजरातमधील एका जागेवर एनडीएला बिनविरोध विजय मिळाला. इथं परिस्थितीच अशी तयार झाली, की निवडणुकीचीच गरज लागली नाही आणि भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय जाहीर करण्यात आला. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: बहुमत न मिळाल्यास? 

    सत्ताधाऱ्यांना जनतेचं बहुमत मिळवण्यात अपयश मिळालं तर, त्यांच्या वतीनं सत्तेचं हस्तांतरण निश्चित करत संविधानानं आखून दिलेल्या मर्यादांचं पालन करावं, ही बाब निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांना अनुसरून लिहिलेल्या पत्रात अधोरेखित केली. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांसह निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना अनुसरून लिहिण्यात आलेल्या या Open Letter वर जी. एम. अकबर अली, अरुणा जगदीसन, डी. हरिपरन्थमन, पी.आर. शिवकुमार, सी.टी. सेल्वम, एस. विमला या मद्रास उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची स्वाक्षरी असून, पटना उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश अंजना प्रकाश यांचीही स्वाक्षरी या पत्रावर आहे. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कुठे पाहता येतील लोकसभा निवडणूक निकालांचे Live आकडे? 

    www.results.eci.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही लोकसभा निवडणूक निकालाचे आकडे पाहू शकता. 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      सर्वप्रथम वरील संकेतस्थळाला भेट द्या आणि तिथं Parliamentary Constituencies वर क्लिक करा. तुमच्यासमोर सविस्तर यादी येईल. 

    • तुम्हाला एखाद्या ठराविक जागेचे निकाल अपेक्षित असल्यास राज्य आणि त्यानंतर मतदारसंघ निवडा. 

    • मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही वेळातच ही आकडेवाही संकेतस्थळावर अपडेट होण्यास सुरुवात होईल. 

    • iOS आणि अँड्रॉईड मोबाईल वर Voter Helpline अॅपचाही वापर तुम्ही करू शकता. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 18 व्या लोकसभेत बाजी कोण मारणार? 

    तब्बल 43 दिवसांसाठी चाललेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासात जाहीर होणार असून, आता पहिले कलही येण्यास सुरुवात होणार आहे. भाजपप्रणीत एनडीएला एक्झिट पोलमध्ये कौल मिळालेले दिसले. त्यानुसार देशात त्यांचीच सत्ता कायम राहते की, इंडिया आघाडीला मतदार संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  महाराष्ट्रात प्रतिष्ठेची लढाई 

    राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई रंगल्याचं यंदा पाहायला मिळालं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडली. शिवसेनेतल्या फुटीनंतर राज्यातील जनता शिंदे की ठाकरे कुणाला पसंती देणार हे या निकालातून समोर येणार आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत. पहिल्यांदाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय महायुतीत पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे येणार का, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

  • Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  जनतेचा कौल कुणाला? 

    2014 मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आलं होतं. यंदाही भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. त्यामुळं आता भाजपचा हा नारा पूर्ण होणार की इंडिया आघाडी भाजपला रोखत आघाडी सरकार स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच धर्तीवर देशातील जनतेनं कुणाला कौल दिलाय हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link