Lok Sabha Election Result 2024: कोणालाच बहुमत न मिळाल्यास संविधान...; 7 निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपतींवर सोपवली मोठी जबाबदारी
Lok Sabha Election 2024 Result: देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कल कोणाच्या बाजूनं जाणार आणि निकालांमध्ये बाजी कोण मारणार, या चर्चांदरम्यानच आणखी एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Lok Sabha Election Result 2024 Latest News: लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर देशात सत्तास्थापनेच्या समीकरणांना सुरुवात होणार असून, सत्तापरिवर्तन झाल्यास देशाला नवं सरकार मिळण्याची चिन्हं आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच (PM Naredndra Modi) सत्ता कायम राहिल्यास ते तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची किमया करताना दिसतील. या परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या निकालात कोणालाही बहुमत मिळालं नाही तर.... ?
उच्च न्यायालयातील सात निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून एक पत्र लिहिलं. ज्यामध्ये या न्यायाधीशांनी लोकशाही परंपरेचं पालन करण्याची विनंती केली. 2024 च्या निवडणूक निकालांमध्ये कोणालाही बहुमत न मिळाल्यास होणारा घोडेबाजार रोखम्यासाठी निवडणूकपूर्व युतीलाच सरकार स्थानपनेसाठी आमंत्रित करण्याचा आग्रह केला.
सत्ताधाऱ्यांना बहुमत मिळालं नाही तर...
सेवानिवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांना अनुसरूनही विनंतीपर सूर आळवला. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना जनतेचं बहुमत मिळवण्यात अपयश मिळालं तर, त्यांच्या वतीनं सत्तेचं हस्तांतरण निश्चित करत संविधानानं आखून दिलेल्या मर्यादांचं पालन करावं, ही बाब अधोरेखित केली. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांसह निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना अनुसरून लिहिण्यात आलेल्या या Open Letter वर जी. एम. अकबर अली, अरुणा जगदीसन, डी. हरिपरन्थमन, पी.आर. शिवकुमार, सी.टी. सेल्वम, एस. विमला या मद्रास उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची स्वाक्षरी असून, पटना उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश अंजना प्रकाश यांचीही स्वाक्षरी या पत्रावर आहे.
हेसुद्धा वाचा : Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: देशात सत्तापरिवर्तन की आणखी काही? पाहा लोकसभा निवडणूक निकालांचे सर्व Updates एका क्लिकवर
पत्रात काय म्हटलंय?
निवृत्त न्यायाधीशांनी या पत्रांमध्ये संविधानानं आखून दिलेल्या मर्यादांचं पालन करत त्यातील तरतुदींच्या मतदीनं देशातील लोकशाही अबाधित राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी आर्जव केली आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये या निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. थोडक्यात सत्ताधाऱ्यांनी बहुमत गमावल्यास राष्ट्रपतींच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल असं चित्र पाहायला मिळत आहे.