लखनौ : उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नवं राजकीय समीकरण जुळलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. 


बसपा आपला उमेदवार देणार नाही


या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. या पोटनिवडणुकीसाठी बसपा आपला उमेदवार देणार नाही. भाजपला रोखण्यासाठी ही रणनिती आखण्यात आली आहे. मात्र 2019 करता सपा-बसपामध्ये अजून युती झालेली नसल्याचा खुलासा, मायावतींनी केला आहे.