Crime News : 38 वर्षाच्या भाभीचं 20 वर्षाच्या दीरासोबत जुळलं सूत, अन् असा झाला प्रेमाचा अंत!
Devar Bhabhi Love Affair: 38 वर्षीय वहिनी 20 वर्षांच्या दीराच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांचा प्रेमाचा भयानक अंत झालाय. दोघंही वैतागून घरातून निघून जातात आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
Devar Bhabhi Crime News: प्रेमाच्या प्रकरणात (love affair) कोण कोणत्या थरावर जाईल सांगता येणार नाही. देवर-भाभीचे व्हिडिओ (Devar Bhabhi) अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये यूजर्स त्यांच्या बॉन्डिंगचा आनंद घेतात. भावजय आणि वहिनीचा नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना (Crime News) समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
श्रीगंगानगरच्या सुरतगडमधील (Sri Ganganagar Crime News) ही घटना आहे. 38 वर्षीय वहिनी 20 वर्षांच्या दीराच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांचा प्रेमाचा भयानक अंत झालाय. रंगमहाल गावातील नई बेरेकन येथे राहणारा केसाराम त्याचं वय केवळ 20 वर्ष होतं. वहिणी सुनीता, जिचं वय अवघं 38 वर्ष होतं. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. एक दिवस अचानक दोघांच्या प्रेमप्रकरणांबद्दल घराच्यांना माहिती मिळते.
दोघांच्या प्रेमप्रकरणांवरून घरात यावरून जोरदार भांडण होतं. त्यामुळे त्याची गावभर चर्चा झाली. दोघंही वैतागून घरातून निघून जातात आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. सूरतगड-हनुमानगड रेल्वे ट्रॅकवर दोन्ही प्रेमी जोडप्यांनी आपलं आयुष्य संपवलं.
आणखी वाचा - 'सॉरी मम्मी-पापा... I Quit, मी इंजिनिअर होऊ शकत नाही' मुलीने कॉलेजच्या इमारतीवरुन...
रंगमहल येथील रेल्वे स्थानक अधीक्षकांना माहिती मिळताच स्थानक प्रभारी भगवान सिंह (Bhagwan Singh) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रथम मृतदेहांची ओळख पटवून घेतली आणि पंचनामा सुरू केला. दोघांचेही मृतदेह सुरतगडच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले होते. भगवान सिंह यांनी यावर सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, घरच्यांचा दबाव आणि गावात झालेली बदनामी यामुळे दोघांनी टोकाचं पाऊल उचललं, असा अंदाज लावण्यात येत आहे. तर काही गावकऱ्यांनी ऑनर किलिंगची शक्यता देखील व्यक्त केली आहे. पोलीस (Rajastan Crime News) त्या अॅगलने देखील चौकशी करत आहेत.