LPG Price: नोव्हेंबर महिना आणि खर्च सर्वकाही एकत्रच आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचे आणि पर्यायी वारेमाप खरेदीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. अशा या महिन्याच्या पहिल्याच दिवशी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कारण, Oil Marketing कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 नोव्हेंबर 2023 पासून अधिकृतपणे 19 किलेग्राम वजनाच्या व्यावसायिक एलपीजीच्या दरांत 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळं आता हे नवे दर 1833 रुपये इतके असतील. यापूर्वीही एलपीजीमध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आली होती. ज्यामुळं मागील तीन महिन्यांमध्ये 311 रुपयांनी व्यावसायिक एलपीजीचे दर वाढले आहेत. 


नव्यानं दरवाढ करण्यात आल्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर मुंबईत 1785.50 रुपये, चेन्नईमध्ये 1999.50 रुपये आणि दिल्लीमध्ये 1833 रुपयांवर पोहोचले.


 


घरगुती सिलेंडरचे दर मात्र स्थिर 


व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झालेली असली तरीही घरगुती सिलेंडरचे दर मात्र जै से थे असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 902.5 रुपयांवर असून, चेन्नईमध्ये हे दर 918.5 रुपयांवर आहेत. कोलकाता येथे दर 929 रुपयांवर आहेत तर, दिल्लीमध्ये हे दर 903 रुपयांवर आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maratha Reservation LIVE: निर्णय घ्या नाहीतर पाणीही पिणार नाही- मनोज जरांगे -पाटील 


दरम्यान देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मात्र कोणतेही बदल केले नाहीत. शिवाय विमानाच्या इंधन दरांमध्येही कमात केली. तीन वेळा सातत्यानं दरवाढ केलेली असताना या महिन्यात मात्र या दरवाढीला तेल कंपन्यांनी ब्रेक लावला. एविएशन टर्बाइन फ्यूल म्हणजेच ATF च्या दरांमध्ये 1074/KL नं घट करण्यात आली आहे.