5 Slaps With Slipper If Cattle Found Roaming: मध्य प्रदेशमधील शाहडोल जिल्ह्यामधील एका गावातील सरपंचानं अजब फर्मान जारी केला आहे. गावातील लोकांच्या मालकीची पाळीव जनावर रस्त्यांवर मोकाट फिरताना दिसली तर त्या जनावरांच्या मलकांना शिक्षा केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही शिक्षा अगदीच अजब पद्धतीची असणार आहे. सरपंचाने जारी केलेल्या आधेशानुसार, ज्याची गुरं आणि पाळीव प्राणी रस्त्यांवर मोकाट फिरताना दिसतील त्याला स्पीपरचे पाच फटके देण्यात येतील. तसेच या व्यक्तीकडून 500 रुपयांचा दंडही आकारला जाणार आहे.


गावभर दवंडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरपंचांच्या कार्यालयातील कर्मचारी नागनादुई गावातील प्रत्येक घरात जात जाऊन या नव्या नियमाची माहिती देत आहे. सरपंचाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून यासंदर्भात गावभरात दवंडी पिटली जात आहे. गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी डफली वाजवत हे अधिकारी या नव्या नियमाची माहिती देताना दिसत आहेत. गावकऱ्यांना या नव्या नियमाची माहिती देण्यासंदर्भात दवंडी पिटणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. तुमची गुरं गावामध्ये मोकाटपणे फिरताना आढळून आली तर तुम्हाला स्लीपरचे पाच फटके खावे लागतील आणि तुमच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जाईल, असं हे कर्मचारी ओरडून सांगताना दिसत आहे.


गावकऱ्यांचा विरोध


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि पंचक्रोषीमध्ये गावाची मस्करी करण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी या नियमाला विरोध केला आहे. गावकऱ्यांनी सरपंचांच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला असून हा नियम मागे घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी उप-जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून यासंदर्भातील तक्रार केली आहे. मात्र या नव्या नियमामुळे गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भातील मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून या जनावरांवर नियंत्रण कसं ठेवावं याबद्दल मतभेद असल्याचं दिसत आहे.



काहींनी सरपंचांचा निर्णय योग्य असल्याचंही म्हटलं आहे. केवळ गुरांना हाकलून काही होणार नाही यावर कायमस्वरुपी उपाय शोधला पाहिजे. त्यासाठी मालकांनाच दंड करणे योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे जाहीरपणे स्लीपर मारुन आणि दंड आकारुन जनावरं ताब्यात राहणार नाहीत असा युक्तीवाद केला जात आहे. दरम्यान आता हे प्रकरण उप-जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्याने यात पुढे काय होतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. या परिसरामध्ये केवळ गावातील रस्त्यांवरच नाही तर गावाच्या बाजूने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही अनेकदा पाळीव जनावरं खास करुन गायी दिसून येतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.