बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची कर्नाटक पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेले असतानाचा बेळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यावेळी त्यांना धक्काबुक्की झाली, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक पोलिसांची मुजोरी सुरूच आहे. मंत्री पाटील आणि कर्नाटक पोलीस यांच्यात यावेळी वादावादी झाली. यावेळी त्यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी मंत्री पाटील यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. त्यांची आता सुटका करण्यात आली आहे.


त्यापूर्वी त्यांना पोलिसांनी धक्काबुक्कीही केलीय. मला दहशतवाद्यांसारखी वागणूक देण्यात आल्याची माहिती यड्रावकर यांनी दिली. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी  यड्रावकर बेळगावला गेले असता त्यांच्यासोबत हा संतापजनक प्रकार घडला. त्यांना कर्नाटक पोलिसांनी गाडीत बसवून बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालय नेले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना महाराष्ट्राच्या सीमेवर सोडण्यासाठी नेले. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राजेंद्र पाटील हे रिक्षातून बेळगावमधील हुतात्मा चौकात पोहोचले. पण तिथे पोहोचताच कर्नाटकच्या मुजोर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होते. 



मंत्री पाटील शुक्रवारी मध्यरात्रीच बेळगावात दाखल झाले होते. कोणताही सरकारी फौजफाटा न घेता ते बेळगावात पोहोचले. महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींनी बेळगावात येऊ नये, यासाठी कर्नाटक पोलीस राष्ट्रीय महामार्गावर पहाटेपासूनच वाहनांची तपासणी करीत होते. मात्र मंत्री पाटील बेळगावात पोहोचले आणि त्यांनी  हुतात्मा चौकात अभिवादन करण्यास  गेले. अभिवादान सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली आणि अटक केली.