नवी दिल्ली : 'एके ४७' चं अत्याधुनिक रुप असलेली 'एके २०३' ही रायफल भारतीय सैन्यातल्या जवानांना मिळणार आहे. या संदर्भात भारत आणि रशिया दरम्यान करार झालाय. अशा साडे सात लाख 'एके २०३' रायफलींची ऑर्डर रशियन कंपनीला देण्यात आलीय. या रायफल्स भारताच्या ताब्यात आल्या की तीनही दलांना त्या देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर निमलष्करी दलांनाही या रायफल्स पुढच्या दहा ते पंधरा वर्षांत देण्यात येतील. एके २०३ बरोबरच अमेरिकनं कंपनीला ७.६९ एमएम ५९ calibre या अत्याधुनिक रायफल्सची ऑर्डर देण्यात आलीय.


'मेक इन अमेठी'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत एके २०३ रायफलचं उत्पादन सुरू होणार आहे.  या कारखान्यामुळं अमेठीत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या कारखान्यामुळे येत्या काळात जवानांच्या हातात 'मेक इन अमेठी' रायफल दिसणार आहे. 


राहुल गांधींचा बालेकिल्ला आणि त्यांचा मतदारसंघ आहे अमेठी... याच अमेठीत आता नवा कारखाना येऊ घातलाय. हा कारखाना आहे एके २०३ रायफलींचा... पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाचं भूमीपूजन केलंय. रशियाच्या सहकार्यानं अमेठीत एके-२०३ रायफल तयार केल्या जाणार आहेत.


राहुल गांधी देशभरात मेड इन इंडियाचा नारा देताना दिसत आहेत. परंतु, मोदींनी मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात उतरवलीय. त्यामुळं आगामी काळात सैनिक आणि पोलिसांच्या हातात 'मेक इन अमेठी' रायफल दिसणार आहेत.