नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी साडेचार वाजता भेट घेणार आहेत. बंगालमधील विविध प्रकल्पाबाबत ही भेट असल्याचे बोलले जात असले, तरी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्यावरील कारवाई संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, मोदींच्या भेटीपूर्वीच ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांची विमानतळावर भेट झाली. ममता बॅनर्जी यांनी त्यांना भेटवस्तू म्हणून साडी दिली. त्यानंतर आता ममता बॅनर्जी आज मोदींची भेट घेणार आहेत.


काय आहेत बैठकीचे मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर सारदा चिटफंड घोटाळा संदर्भात चौकशी होणार आहे. राजीव कुमार यांच्या बचावासाठी ममता बॅनर्जी यांनी उघडपणे येऊन निदर्शने केली होती.


मोदी आणि बांग्लादेशच्या अध्यक्षा शेख हसीना यांची भेट होणार आहे. त्यात 'तीस्ता पाणी करार' होणार आहे. तीस्ता नदीतील पाणी बांग्लादेशला सोडण्याची परवानगी केंद्र सरकार देणार आहे. यावर ममता बॅनर्जी यांचा विरोध आहे. तीस्ता नदीतील पाणी बांग्लादेशला सोडले तर पश्चिम बंगालमधील गावांना पाणी अपुरे पडेल आणि दुष्काळ येईल अशी भिती ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.


बंगालमधील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला नाही.


ईडी/सीबीआयच्या हस्तक्षेपामुळे राज्य सरकारवर वाढणार दबाव


भाजप कार्यकर्ते यांच्या हिंसेमुळे निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्था


या मुद्द्यांवर आज ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र तरीही या दोघांच्या भेटीनंतरच त्यांच्यात काय चर्चा झाली? याबाबत स्पष्टपणे खुलासा होऊ शकतो. 


ममता बॅनर्जींना अनेकदा नरेंद्र मोदी सरकारविरोधात बोलताना पाहण्यात आले आहे. ममताजींनी केंद्र सरकारच्या अनेक मुद्द्यांवर सरकारविरोधात हल्लाबोलही केला होता. कोलकातातील माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार प्रकरणीही मोदी सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद चांगलाच वाढला होता. 'एक देश एक चुनाव'साठी बोलवण्यात आलेल्या बैठकीतही ममताजींनी सामिल होण्यास नकार दिला होता.