मथुरा : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र, आता भाजपचे कारनामे उघड होत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची योगी सरकारने थट्टाच केलेय. दीड लाख रुपयांचे डोक्यावर कर्ज होते. मात्र, शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणून फक्त १ पैसा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मथुरा जिल्ह्यातील गोवर्धन तालुक्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणून फक्त १ पैसा दिला असल्याचा प्रकार समोर आलाय. छिद्दी असे या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्हा प्रशासनाकडून कर्जमाफीचे मिळालेलं प्रमाणपत्र पाहून शेतकऱ्याला जोरदार धक्का बसला.


योगी सरकारने अशी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे, असे छेद्दी यांनी म्हटले आहे. ही बँकेकडून झालेली चूक आहे की आणखी काही, याबाबत काहीही माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलेय. 



दरम्यान, तांत्रिक चूक असल्याचा दावा मथुराचे जिल्हाधिकारी अरविंद मलप्पा यांनी केलाय. ही चूक दुरुस्त करण्यात येईल. छेद्दी यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर आम्ही चौकशी केली. कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात छेद्दी यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.