नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सीईओ बील गेट्स यांच्या यशस्वी आयुष्याचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या यशस्वी जीवनामागे पुस्तकांची मोठी भूमिका आहे. चांगल्या चारित्र आणि कर्तुत्ववान व्यक्ती घडण्यामागे पुस्तकांचा मोठा वाटा असतो. बील गेट्स सुद्धा त्यांच्या वाचनात आलेल्या सर्वोत्तम पुस्तके लोकांमध्ये शेअर करीत असतात. त्यातील पाच प्रेरणादायी पुस्तके तुम्ही देखील वाचायला हवी.
 
 The Ride of a Lifetime
 हे पुस्तक बॉब  ऐगर यांनी लिहले आहे. या पुस्तकात एखाद्या कंपनीच्या सीईओमध्ये कोणते गुण असावेत याबाबत भाष्य़ केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 
 Where Good Ideas Come From
 
 या पुस्तकाचे लेखक स्टीवन जॉनसन आहेत. त्यांच्या नुसार यशस्वी होण्यासाठी इनोवेशन गरजेचं आहे. बिल गेट्स यांच्या मते नवोदित उद्योजकांसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे.



 
 The Choice
 
 या पुस्तकाचे लेखक डॉ. एडिथ एवा ईगर आहेत. बिल गेट्स यांच्या मते कोवि़ड 19 सारख्या आजाराच्या कालखंडामध्ये हे पुस्तक वाचल्यास आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा मिळू शकते.
 


  Good Economics for Hard Times


  हे पुस्तक अभिजित बॅनर्जी आणि ईस्थर दुफ्लो यांनी लिहलं आहे. हे पु्स्तक अमेरिका सारख्या श्रीमंत देशांतील अर्थव्यवस्थेतील उणीवा, असमानता आणि पॉलिटिक्सच्या बाबतीत भाष्य करते.
  
 


  Cloud Atlas
 


डेविड मिशेल यांनी ही कादंबरी लिहली आहे. बिल गेट्स यांच्या मते या पुस्तकात हजारो वर्षात न बदलनारी आणि बदलनाऱ्या इंटरेस्टींग गोष्टींविषयी भाष्य केले आहे. ह्युमन व्हॅल्युज बाबतीतही ही कादंबरी मार्गदर्शन करते.