नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे मे महिन्यातच नियोजित केलेल्या ६५ रेल्वे रद्द कराव्या लागल्याची माहिती मध्य रेल्वेनं पत्रक प्रसिद्ध करत दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये श्रमिक रेल्वे सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मागणी केली नसल्याचं दिसून आल्याचं निरिक्षणही मध्य रेल्वेकडून या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
Coronavirus कोरोना व्हायरसच्या प्राश्वभूमीवर सलागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. श्रमिक रेल्वे सोडण्यासंदर्भातचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळ घेतला त्यामुळे नियोजित केलेल्या ६५ रेल्वे रद्द कराव्या लागल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. दरम्यान, रेल्वे मंत्रालयानं प्रत्येक राज्यासोबत संपर्क साधून रेल्वे पुरवल्याची माहितीही समोर आली. 


वाचा : बघा, इतकं सांगूनही महाराष्ट्र सरकारने अजूनही मजुरांची यादी दिली नाहीये'


 


मध्य रेल्वेनं पत्रकात नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले? 


- २३ मे पर्यंत रेल्वे मंत्रालयानं ५२० रेल्वे महाराष्ट्र सरकारला उपलब्ध करून दिल्या.


- उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या रेल्वेंच्या माध्यमातून जवळपास ७ लाख ३२ हजार कामगारांना घरी पोहचवता आलं.


- यादरम्यान ६५ रेल्वे फक्त महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे रद्द कराव्या लागल्या.


- नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये श्रमिक रेल्वे सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मागणी केली नसल्याचं दिसून आलं आहे.



 


राज्य शासनामुळे रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्या तरीही आतापर्यंत राज्याला गरज भासल्याप्रमाणे प्रत्येक वेळी रेल्वे मंत्रालयाकडून त्याची मागण्यांची पूर्तता करण्यात आली आहे आणि यापुढेही करण्यात येईल असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं.