मुंबई : भारतात अशी अनेक मंदिरं आहेत जी त्यांच्या दुर्मिळ चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांपैकी एक म्हणजे माता खीर भवानी मंदिर, जे काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये चिनाराच्या झाडांनी वेढलेलं आहे. प्रसिद्ध राग्या देवी मंदिरात होणारा वार्षिक खीर भवानी मेळा हा विस्थापित समाजाचा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम मानला जातो. हे मंदिर नैसर्गिक सौंदर्य, चमत्कार आणि धार्मिक श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं मानलं जातं की, हे मंदिर दैवी शक्तींनी परिपूर्ण आहे. काश्मीरवर जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येतं तेव्हा माता खीर भवानी संकट येण्याचा संदेश देते.


तलावातील पाण्याचा रंग बदलतो


असं मानलं जातं की, जेव्हा संकट येतं तेव्हा या मंदिरात असलेल्या तलावातील पाण्याचा रंग बदलू लागतो. या मंदिराची मुळं रामायण काळाशी निगडीत असल्याचे लोकं मानतात. या चमत्कारापुढे विज्ञानानेही गुडघे टेकले आहेत. 


माँ दुर्गेचे राघ्य पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक येतात. हे मंदिर दैवी शक्तींनी परिपूर्ण असून याठिकाणी असलेला तलाव चमत्कारिक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. जेव्हा जेव्हा काही संकट येणार असतं तेव्हा तलावाच्या पाण्याचा रंग काळा किंवा लाल होतो. 


असं म्हटलं जातं की, 2014 मध्ये जेव्हा काश्मीरला भीषण पुराचा फटका बसला तेव्हा या तलावाचं पाणी काळं झालं होतं. त्याच वेळी जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा या तलावाचे पाणी लाल झालं होतं. असं नाही की हे कुंड केवळ संकट किंवा आपत्तीचे संकेत देतं तर ते चांगल्या घटनेचेही संकेत देतं


लोकांचं म्हणणं आहे की, कलम 370 हटवल्यामुळे या तलावाचे पाणी हिरवं झालं होतं. असं मानलं जातं की, या तलावाचं पाणी हिरवं झालं की, तो आनंदाचं लक्षण आहे.