पोस्टाची भन्नाट योजना! लहान मुलांचं खातं उघडल्यावर मिळणार दरमहा 2500 रूपये
Post Office Scheme च्या माध्यमातून दर महिन्याला मिळणार 2500 रुपये
Post Office Scheme : स्वत:च्या आर्थिक प्रगतीसाठी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. यामध्ये बँकेमधील मुदतठेवी, सोनं, शेअर्स किंवा म्युच्युचल फंड्सचा देखील समावेश आहे. मात्र, कमी जोखीमसह गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या योजना खुप महत्त्वाच्या ठरतात. बँकेप्रमाणेच पोस्टानेही अनेक योजना ग्राहकांना ऑफर केल्या आहेत. (MIS 2500 will be received every month through Post Office Monthly Income Scheme)
व्याजाचा परतावा मिळण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची एमआयएस (MIS) ही योजना तुमच्यसाठी फायदेशीर ठरू शकते.
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेनुसार 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही खातं उघडता येणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये (Post Office Monthly Income Scheme) तुम्ही तुमच्या नावाने विशेष खाते उघडू शकता. त्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता देखील संपणार आहे. तुम्हाला दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजाकरिता तुम्ही शिक्षण शुल्क भरू शकता.
खातं कसं उघडता येईल?
योजनेचा लाभ घेण्यासाठी (Post Office Monthly Income Scheme Benefits) सर्वात प्रथम तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडावं लागेल. या योजनेद्वारे तुम्ही कमीतकमी 1000 रूपये ते जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करू शकता. सध्या या योजनेद्वारे 6.6 टक्के व्याजदर (Post Office Monthly income Scheme Interest Rate) मिळू शकतो.
मुलाचं वय हे 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मुलाच्या नावाने देखील खातं चालू करू शकता. जर मुलाचं वय हे 10 वर्षापेक्षा कमी असेल तर पालकांच्या नावाने खातं उघडलं जाऊ शकतं. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्ष असेल. त्यानंतर तुम्ही खातं बंद करू शकता.
Post Office Scheme चा फायदा कसा होतो?
मुलाचं वय जर 10 वर्षाच्या वर असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख जमा करत असाल तर 6.6 टक्के व्याजदरानुसार 1100 रुपये होतात. पाच वर्षात याच व्याजदराने 66 हजार रुपये तुम्हाला मिळतील आणि अखेर तुम्हाला तब्बल 2 लाख रुपये रिटर्न मिळणार आहे. जर पोस्टाच्या या योजनेत 4.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अखेरीस दरमहिन्याला 2500 रुपये देखील मिळू शकतात.