Covaxin आणि Covishield च्या मिश्रणाचे सकारात्मक परिणाम; ICMR चा दावा
आपल्या देशातही कोरोना लसींच्या कॉकटेल म्हणजेच मिक्स डोसवर सुद्धा अभ्यास करण्यात आला.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी वेगवेगळ्या लसींवर संशोधन सुरू आहे. आपल्या देशातही कोरोना लसींच्या कॉकटेल म्हणजेच मिक्स डोसवर सुद्धा अभ्यास सुरू आहे.
ICMR च्या संशोधनामध्ये कॉकटेलचे रिपोर्ट समोर आला आहे. कोरोनाच्या विरोधात भारतीयांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्स डोसबाबत झालेल्या संशोधनाचे चांगले परिणाम समोर आले आहेत.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे मिश्रण करून 300 निरोगी कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या परिक्षणात संबधित कार्यकर्त्यांमध्ये कोरोना संसर्ग प्रतिकारकशक्तीत सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले.