पणजी : गोव्यातील राजकीय घडामोडीचा अखेरचा अंक आज संपला. गोवा मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. गोव्यात आज नव्या मंत्र्यांचा शपथविधीसोहळा पार पडला. काँग्रेसच्या १५ आमदारांपैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज दुपारी ३च्या वाजताच्या सुमारास बंडखोर आमदारांचा शपथविधी पार पडला. या १० पैकी ४ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा राजभवन येथे काँग्रेस मधून आलेल्या मंत्र्यांचा शपथविधीसोहळा पार पडला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी आज गोवा राजभवन येथे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय फिलीप नेरी रॉड्रिक्स, मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 



तर विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर आणि रोहन खवटे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. गोवा फॉरवर्ड या पक्षाला भाजपने मोठा धक्क्का दिला आहे.