नवी दिल्ली : मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर दिली आहे. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर व्याजदर सरकारने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना शेतीवर ९ टक्के ऐवजी ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शेतीसाठी व्याजदरात सरकार २ टक्के सबसिडी देणार आहे. याशिवाय वेळेवर कर्ज भरलं तर ३ टक्के कमी व्याज घेतलं जाईल.


स्कीमनुसार व्याजाचा 5% भाग सरकार शेतकऱ्यांना परत करणार आहे. ही सुविधा १ वर्षासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी असणार आहे. या स्कीमनुसार ३ लाखांपर्यंत कर्ज मिळेल. या स्कीममधून सरकार जवळपास १९००० कोटी रुपये खर्च करेल. या स्कीममधून शेतकऱ्यांना ९% व्याजावर मिळणारं कर्ज ४ टक्क्यांनी मिळेल.