मुंबई : जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या 10 युट्युब चॅनेलवर (Youtube Channel) सरकारने कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती दिली की, व्हिडिओंमध्ये अनेक आक्षेपार्ह कंटेंट होता. धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने बनावट बातम्या आणि मॉर्फ केलेले व्हिडिओ (morphed videos) यांचा देखील यात समावेश आहे. यामध्ये अनेक खोटे दावे करण्यात आले होते. जसे की सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतले आहेत. अशी खोटी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पसरवली जात होती. (India blocks 45 YouTube videos found spreading lies)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने YouTube ला 10 YouTube चॅनेलवरील 45 YouTube व्हिडिओ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. ब्लॉक केलेल्या व्हिडिओंना 1 कोटी 30 लाखांहून अधिक व्ह्यूज होते अशी माहिती ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली आहे.



माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि प्रतिमा भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला हानी पोहोचवण्यासाठी वापरली जात आहेत.


I&B मंत्रालयाने व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ला 23 सप्टेंबर रोजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम 2021 च्या तरतुदींनुसार ते 45 व्हिडिओ त्वरित ब्लॉक करण्याचे निर्देश दिले.